मुंबई

Polio vaccine: रायगड जिल्ह्यात 32 हजार बालकांना पोलिओ डोस

महेंद्र दुसार

मुंबई: रायगड जिल्ह्यात शून्य ते पाच वर्षातील 32 हजार बालकांना रविवारी पोलिओ डास पाजण्यात आले. पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत माणगाव येथील ग्रामीण रुग्णालय येथे पल्स पोलिओ मोहिमेला सुरुवात करण्यात आली. 

रायगड जिल्ह्यात पल्स पोलिओ लसीकरणासाठी 197 पोलिओ बुथवर तयारी करण्यात आली होती. प्रत्येक बुथवर आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, शिक्षक, तसेच स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यात आली होती, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनी दिली. लसीकरणापासून एकही बालक वंचित राहू नये यासाठी एसटी बसस्थानके, बाजारपेठा, यात्रा, खासगी दवाखाने येथे बुथ ट्रान्झिट टीम आणि मोबाईल टीमद्वारे लसीकरण करण्यात आले. यासाठी कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले होते.

माणगाव येथील लसीकरण कार्यक्रमासाठी पालकमंत्री आदिती तटकरे, यांच्यासह  माणगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा योगिता चव्हाण, नगरसेवक रत्नाकर उभारे, संदीप खरंगटे, नितीन वाढवळ, प्रांताधिकारी प्रशाली दिघावकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुहास माने तसेच आरोग्य विभागाचे इतर अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचा- Corona Vaccination: आरोग्य कर्मचार्‍यांनंतर फ्रंटलाईन कामगारांना फेब्रुवारीपासून लसीकरण
 
राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहीमेंतर्गत आपल्या घरातील 0 ते 5 वयोगटापर्यंतच्या मुलांना ही लस द्यायला विसरू नका. तसेच कोरोनाविषयक सर्व नियमांचे पालन करून ही लसीकरण मोहीम आपण सर्वांनी यशस्वी करू या,असे आवाहन उपस्थितांना पालकमंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी केले.

-----------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Polio vaccine given 32 thousand children Raigad district Aditi Tatkare

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: मनोज जरांगे OBC मधूनच Maratha आरक्षणावर ठाम का? स्वतंत्र आरक्षणाला विरोध का? टेक्निकल गोष्ट समजून घ्या...

Service Charge Scam : सेवा शुल्काच्या नावाखाली हॉटेलमध्ये लूट; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश धाब्यावर; पाच ते २० टक्क्यांपर्यंत वसुली

Maratha Protest : मराठ्यांच्या वादळाने मुंबईत वाहतूक कोंडी, फ्री वेनंतर जेजे फ्लायओवरही बंद; कोस्टल रोडवर वाहनांच्या रांगा

Pitru Paksha 2025: यंदा 6 कि 7 सप्टेंबर यंदा पितृपक्ष कधी? एका क्लिकवर सर्व महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या

Marathwada Dams: मोठ्या धरणांच्या साठ्यात दुपटीने वाढ; मराठवाड्यातील स्थिती, मानार, सीना कोळेगाव शंभर टक्के भरले

SCROLL FOR NEXT