मुंबई

नवी मुंबईचे वातावरण तापले; निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नव्या पक्षाची एन्ट्री

विक्रम गायकवाड

नवी मुंबई  : नवी मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीने सत्ताधारी भाजपविरोधात रणशिंग फुंकले आहे. तर दुसरीकडे नवी मुंबई विकास आघाडीच्या माध्यमातून रिपब्लिकन सेना, शेकाप, समाजवादी पक्ष यांच्यासह 10 सेक्‍युलर पक्ष आणि संघटनांनी एकत्र येत निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे भाजपला आणखी धोका निर्माण झाला असून यंदा तिहेरी लढतीत निवडणूक अधिक रंगतदार होणार आहे. 

कोरोनामुळे एक वर्ष लांबणीवर पडलेली नवी मुंबई महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक येत्या एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे सर्वच पक्ष संघटनांनी या निवडणुकीत उतरण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजप, आरपीआय आठवले गटाला धूळ चारण्यासाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीने जोरदार फिल्डिंग लावली आहे. यासाठी भाजपच्या नगरसेवकांना फोडण्याची मोहीमही सुरू केली आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे. सध्या या दोन्ही पक्षांत फोडाफोडीचे राजकारण चांगलेच तापले आहे. यात आता नवी मुंबई विकास आघाडीनेही एन्ट्री केली आहे. 
नवी मुंबईच्या झोपडपट्टी विभागात वर्षानुवर्षे काम करणाऱ्या नवी मुंबई विकास आघाडी रिपब्लिकन सेना, शेकाप, समाजवादी पक्ष, मार्क्‍सवादी, लालबावटा, घर हक्क संघर्ष समिती, सोशालिस्ट पक्ष, आरपीआय आर.के., जनता दल सेक्‍युलर, महाराष्ट्र जनशक्ती सेना, सीपीएम या सेक्‍युलर पक्ष आणि संघटनांना महविकास आघाडी विचारात घेत नाही. त्यामुळे या सर्वांनी एकत्र येऊन नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. 

या संदर्भात पुढील हालचालींसाठी सेक्‍युलर पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक गुरुवारी (ता. 4) बेलापूर येथील शेकापच्या कार्यालयात पार पडली. या बैठकीत एकत्र आलेल्या 10 सेक्‍युलर पक्षांनी नवी मुंबई विकास आघाडीच्या माध्यमातून पालिकेची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती रिपब्लिकन सेनेचे नवी मुंबई प्रमुख तथा नवी मुंबई विकास आघाडीचे सदस्य खाजामिया पटेल यांनी दिली. 
सध्या इंधन दरवाढ, आणि विजबिलविरोधात नागरिक संतापली असताना महाविकास आघाडी त्यात उतरून रस्त्यावर आली आहे. यात भाजपची मात्र नाचक्की होताना दिसत आहे. आता नवी मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत सेक्‍युलर पक्षाच्या नवी मुंबई विकास आघाडीने उडी घेतल्याने भाजपला एक नवा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे जागा जिंकण्यासाठी भाजप आता काय करणार हे पाहणे आत्सुक्‍याचे झाले आहे. अर्थात, ही निवडणूक अधिक रंगतदार होणार आहे.

----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

politics news marathi navi mumbai vikas aghadi establish political latest update

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT