Politics Shiv sena Police investigations in many cases will cool down due to cahnge of political parties mumbai
Politics Shiv sena Police investigations in many cases will cool down due to cahnge of political parties mumbai  esakal
मुंबई

सत्तांतरामुळे पोलीस तपासावर परिणाम अनेक प्रकरणातली पोलीस चौकशी थंडावणार?

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : शिवसेनेत झालेल्या बंडखोरीमुळे राज्य सरकार अस्थिर झाले आहे. सत्तातर झाल्यास, अडीच वर्षापासून सुरु असलेल्या केंद्र विरुध्द राज्य सरकार हा संघर्ष शांत होण्याची शक्यता आहे. या सोबत विरोधी पक्षांच्या नेत्याविरुध्दच्या अनेक प्रकरणावर याचा परिणाम होणार आहे. यात प्रामुख्याने रश्मी शुक्ला, प्रवीण दरेकर ते निलेश राणे प्रकरणातील पोलीस चौकशी थंडावण्याची शक्यता आहे. यापुर्वी सत्तातरणानंतर अनेक नेत्यांविरुध्दचा तपास गुंडाळण्याची वेळ पोलीसांवर आली होती.

बोगस मजूर प्रकरण

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर बोगस मजूर प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आला होता.मजूर असल्याचे सांगून त्यांनी मुंबै बँक, हजारो ठेवीदार आणि सहकार विभागाची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर होता.आम आदमी पक्षाच्या तक्रारीवरुन दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल केला गेला.

सध्यस्थिती- मुंबई उच्च न्यायालयाने दरेकर यांना जामीन दिला असून चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगीतले

रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरण

प्रकरण- राज्य गुप्तचर विभागाचे (SID) प्रमुख असताना विरोधी पक्षाच्या नेत्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप करण्याचा आऱोप रश्मी शुक्ला यांच्यावर आहे. भारतीय टेलिग्राफ कायदा, विविध कलमाखाली कुलाबा आणि पुण्यात शुक्ला यांच्याविरुध्द गुन्हा नोंदवला. शुक्ला यांना चौकशीसाठी बोलावलं गेल या प्रकरणार संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांच्या जबाबासह २० नेत्यांचे जबाब नोंदवले गेले.

सध्यस्थिती- शुक्ला यांच्याविरुध्द ७०० पानांचे आऱोप पत्र पोलीसांनी दाखल केले.

संतोष परब हल्ला प्रकरण

कणवलीतील शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी निलेश राणे यांच्यावर गुन्हे दाखल झाले. त्यांना अटक करण्यात आली.

सध्यस्थिती- सिंधुदुर्ग न्यायालयाने जामीन मंजूर केला होता.

आयएनएस विक्रांत निधी घोटाळा

आयएनएस विक्रांत ही युध्दनौका वाचविण्याच्या निमित्ताने भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांनी ५७ कोटी रुपये गोळा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणात किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांच्याविरोधात गुन्हे दाखल झाले

सध्यस्थिति- सोमय्या पिता-पुत्राना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला, चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगीतले.

बँक फसणूक प्रकरण

प्रकरण- मोहित कंबोज यांच्या कंपनीने विविध बँकांचे 52 कोटी रुपयांचे कर्ज बुडवले या आरोपाखाली मुंबई पोलीसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं गुन्हा दाखल केला.या प्रकरणात मोहित कंबोज यांच्यावर अटकेची टांगली तलवार होती.

सध्यस्थिती- कंबोज यांनी मुंबई सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला.

हनुमान चालीसा प्रकरण

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थाना बाहेर हनुमान चालीसाचं पठण करण्याच्या प्रकरणात मुंबई पोलिसांकडून त्यांना अटक झाली होती. राणा दाम्पत्य जवळपास दोन आठवडे वेगवेगळ्या जेलमध्ये होते. संबंधित प्रकरणी राणा दाम्पत्याची जामीनावर सुटका झाली होती. धनराज वंजारी, माजी पोलीस अधिकारी निवृत्त पोलिस अधिकारी धनराज वंजारी यांनी दिलेल्या प्रतिक्रिया नुसार तपास सत्ताभिमुक होईल संविधनभिमुक नाही!

साधारणतः असे सत्तांतर जेव्हा होते तेव्हा संबंधित नेते जर सत्तेत आले तर प्रकरणांचा तपास हा मंदावतो असेच आपल्याला सध्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी संबंधित प्रकरणात पाहायला मिळाले होते.

एड कनिष्क जयंत, वरिष्ठ वकील

सत्तांतर झाल्यानंतर सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्या संबंधित प्रकरणांचा तपास यंत्रणा तपास कसा करतात या वर अवलंबून असते. बऱ्याच वेळा असे आढळून आले आहे की संबंधित नेत्याच्या प्रकरणाचा तपास मंदावतो आणि पुराव्या अभावी कोर्टात आरोप पत्र दाखल करता येत नाही. जर आरोपपत्र दाखल असल्यास पूराव्या अभावी कोर्टात आरोपीची मुक्तता झाल्याची सुद्धा उदाहरणे आहेत.

- केदार शिंत्रे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT