मुंबई

प्रदूषणाचा विषारी डंख

सकाळवृत्तसेवा

मुंबई - देशातील सर्वाधिक प्रदूषित शहर समजल्या जाणाऱ्या दिल्लीलाही मुंबई आणि नवी मुंबईने मागे टाकल्याने आरोग्याचा प्रश्‍न पुन्हा गंभीर झाला आहे. सातत्याने होत असलेले वातावरणातील बदल, शहरभर पसरलेला कचरा आणि उघड्यावर केल्या जाणाऱ्या प्रातर्विधीमुळे मुंबईकरांचे आरोग्य आधीच धोक्यात आले असतानाच प्रदूषणाच्या डंखामुळे त्यांचे शरीर पोखरले जात आहे.

केंद्र सरकारच्या निकषानुसार मुंबईची हवा ‘वाईट’ श्रेणीत पोहोचली आहे. शहरातील हवा श्‍वसनासाठी योग्य राहिलेली नाही. त्याचा थेट परिणाम मानवी जीवाच्या फुप्फुसावर होत आहे. प्रदूषणामुळे फुप्फुसाचा कॅन्सर होऊ शकतो; पण माणसाच्या डोक्‍याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत त्याचे दुष्परिणाम जाणवतात. श्‍वसनविकाराने त्रस्त असलेले रुग्ण, वृद्ध आणि लहान मुलांमध्ये प्रदूषणाचे परिणाम दिसू लागले आहेत. प्रदूषणात प्रामुख्याने २.५ आणि १० असे दोन प्रकारचे तरंगते धूलिकण आढळतात. त्याचबरोबर नायट्रोजन डायऑक्‍साईड आणि सल्फर डायऑक्‍साईड अशी प्रदूषकेही आढळतात. वाढलेल्या प्रदूषणामुळे त्वचेची जळजळ, बुरशीजन्य आजार आणि घामोळ्यांसारखे त्वचा विकार होतात.

प्रदूषण जास्त काळ टिकल्यास त्याचे परिणाम जाणवू लागतात. प्रदूषणामुळे खास करून खरूज आणि बुरशीजन्य त्वचाविकार असे आजार आढळतात. पण, प्रदूषणाचा सर्वाधिक परिणाम मानवाच्या अंतर्गत अवयवांवर होतो.
- डॉ. उदय खोपकर, त्वचा विकार विभाग प्रमुख, केईएम रुग्णालय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'7 दिवस पत्नी अन् 7 दिवस प्रेयसीसोबत राहतो'; कराराच्या आधारे कोर्टाने केली आरोपीची सुटका

Latest Marathi News Live Update : नंदुरबार येथे काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची उद्या सभा

Share Market Opening: गुंतवणूकदार चिंतेत! शेअर बाजारात पुन्हा घसरण; 'या' शेअर्सचे मोठे नुकसान

Nagpur Crime News : प्रेयसीने बोलणे बंद केल्याने पेटविले दुकान; आरोपीला अटक

Jasprit Bumrah : मुंबईचा खेळ संपला तरी... बुमराह ‘ऑन ड्युटी २४ तास’, वर्ल्ड कपच्या तोंडावर पण मिळणार नाही विश्रांती

SCROLL FOR NEXT