मुंबई

मोडकळीस आलेल्या इमारतींना दिलासा

सुजित गायकवाड

नवी मुंबई - वाशीतील धारण तलावावरील पादचारी पुलाचा काही भाग गेल्या पंधरवड्यात कोसळला. या दुर्घटनेमुळे हादरलेल्या पालिका प्रशासनाने अखेर वाशीतील मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकास प्रस्तावांबाबत सकारात्मक निर्णय घेतला आहे. महापालिका आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांच्या दालनात शुक्रवारी झालेल्या ‘उत्तुंग इमारत समिती’ने सिडको निर्मित एकता, श्रद्धा, कैलास आणि अवनी या सोसायट्यांच्या पुनर्विकासाच्या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवला आहे. ‘सकाळ’ने १३ एप्रिलला यासंबंधी ‘धोकादायक इमारतींमधील रहिवाशांमध्ये धास्ती’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती. यामध्ये रहिवाशांच्या व्यथा मांडल्या होत्या.

सिडकोने बांधलेल्या जेएन-वन आणि जेएन-टू इमारतींची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. त्यापैकी ३०० पेक्षा अधिक इमारती कधीही कोसळतील, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर अतिधोकादायक असलेल्या २३ सोसायट्यांनी पालिकेकडे पुनर्विकासासाठी परवानगी मागितली आहे; परंतु पालिकेच्या नगररचना विभागाने बांधकाम परवानगी अद्यापही दिलेली नाही. यामागे वाढलेल्या चटई क्षेत्राचा होणारा पायाभूत सुविधांवरील परिणाम, बांधकाम रचना, इमारतींची उंची यासंबंधी ‘उत्तुंग इमारत समिती’च्या अहवालाची प्रतीक्षा हे प्रमुख कारण होते. रामास्वामी यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेत झालेल्या बैठकीत ‘उत्तुंग इमारत समिती’समोर हे सर्व मुद्दे तपासण्यात आले. त्यानुसार जेएन-वन आणि जेएन-टू या मोडकळीस आलेल्या इमारतींच्या ठिकाणी ३० मजल्यांपेक्षा अधिक मजल्यांच्या इमारती उभ्या राहणार आहेत. त्यांच्या बांधकामांची रचना आणि वाढीव चटई क्षेत्र तपासल्यानंतर श्रद्धा, कैलास अणि एकता सोसायट्यांच्या पुनर्विकासाच्या प्रस्तावाला हिरवा कंदील मिळाला आहे. अवनी सोसायटीलाही परवानगी मिळणार आहे; मात्र त्यांना बदललेला बांधकाम नकाशा सादर करण्याच्या सूचना नगररचना विभागाने दिल्या आहेत. 

‘उत्तुंग इमारत समिती’चा अडथळा दूर झाल्यामुळे आता पुनर्विकासासाठी आवश्‍यक बांधकाम परवानग्या संबंधितांना मिळणार आहेत. या निर्णयामुळे वाशीतील श्रद्धा, अवनी, कैलास व एकता या सोसायट्यांमधील तब्बल १५०० पेक्षा कुटुंबांना दिलासा मिळाला आहे. तर शहरातील मोडकळीस आलेल्या अन्य इमारतींमधील रहिवाशांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. 

२५ वर्षांच्या लढ्याला यश
वाशी सेक्‍टर नऊ आणि १० परिसरात ७० आणि ८० च्या दशकात सिडकोने उभारलेल्या जेएन-वन आणि जेएन-टू प्रकारातील इमारती निकृष्ट बांधकामांमुळे अतिधोकादायक झाल्या आहेत. तेव्हापासून येथील रहिवाशांनी पुनर्विकासाची मागणी सातत्याने केली आहे; मात्र त्याला यश आले नव्हते. शिवसेनेचे नगरसेवक किशोर पाटकर यांनी दरम्यानच्या काळात रहिवाशांना एकत्र केले. पालिका आणि सिडकोच्या आडमुठ्या धोरणाविरोधात न्यायालयात याचिका करून लढा दिला. अखेर  न्यायालयाचे निर्देश व सततच्या पाठपुराव्यामुळे लढाईला यश आले.

गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही प्रशासनासोबत लढत आहोत. इमारत मोडकळीस आलेली असतानाही जीव मुठीत घेऊन राहत आहोत. या परिस्थितीत फक्त बांधकाम परवानगीमुळे पुनर्विकास रखडला होता. त्याला पालिकेने परवानगी दिल्यामुळे लढाईतील पहिला टप्पा जिंकलो, अशी भावना मनात आहे.
- शांताराम जावळे, श्रद्धा सोसायटी, वाशी

‘उत्तुंग इमारत समिती’च्या बैठकीत वाशीतील सिडको निर्मित इमारतींच्या पुनर्विकासासाठी सादर झालेल्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. अवनी सोसायटीच्या पुनर्विकासाकरिता नवीन नकाशा सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
- डॉ. एन. रामास्वामी, आयुक्त, पालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: "आम्ही भाजपच्या मुख्यालयात येतोय हिंमत असेल तर..."; केजरीवालांचं पंतप्रधान मोदींना थेट आव्हान

Pune News: वादळी वाऱ्यामुळे लोणी-काळभोरमध्ये बँड पथकावर होर्डिंग कोसळलं, घोडा गंभीर जखमी

IPL 2024 RCB vs CSK Live Score: ऋतुराज गायकवाडने जिंकला टॉस; बेंगळुरू-चेन्नई संघात मोठे बदल; जाणून घ्या प्लेइंग-11

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Virat Kohli: भारतीय संघात संधी मिळण्यासाठी रैनाची कशी झाली मदत? विराटनं सांगितली 16 वर्षांपूर्वीची आठवण

SCROLL FOR NEXT