तळ्यात विजेचा खेळखंडाेबा
तळ्यात विजेचा खेळखंडाेबा 
मुंबई

तळामध्‍ये विजेचा खेळखंडोबा सुरूच

सकाळ वृत्तसेवा

तळा (बातमीदार) : तळा तालुक्‍यातील विजेचा खेळखंडोबा सुरूच असून त्या विरोधात वर्षभरात दोन मोर्चे निघूनही त्याकडे संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याचे सिद्ध झाले आहे. तालुक्‍यातील अनेक गावांमध्ये आजही आठ-आठ दिवस वीज नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. नळ पाणीपुरवठा योजना बंद असल्याने नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. टोकार्डे गावात गेले आठ दिवस विद्युत पुरवठा खंडित झाल्याने माजी सरपंच विठ्ठल सुतार यांनी ग्रामस्थांसह तळा विद्युत कार्यालयाच्या उपकार्यकारी अभियंत्यांची भेट घेतली.

तळा तालुक्‍यातील विद्युत ग्राहकांची सुमारे १२ हजार ५०० एवढी संख्या आहे. जवळपास ५० ते ६० योजना आहेत. याचा विचार करता लाखोंची कमाई करत असतानाही नागरिकांना सेवा देण्यास कुचराई का केली जात आहे? हा मोठा प्रश्‍न आहे. दुसरीकडे तळा शहरात मात्र सेवा सुरळीत ठेवण्यात आली आहे.

गावात अनेक ठिकाणी पोल पडले असून त्यामुळे फार मोठा धोका संभवतो. पण विद्युत कंपनी याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे. त्यातून जीवितहानी होण्याची शक्‍यता जास्त आहे. याला सर्वस्वी जबाबदार महावितरण कंपनीच असणार आहे याची जाणीव उरलेली दिसत नाही. सध्या कार्यालये ओस पडली असून वायरमन, लाईनमन, डेप्युटी इंजिनिअर यांची संख्याही खूपच कमी असल्यामुळे लोकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. भरमसाठ बिलांची आकारणी, ग्राहकांना बिले वेळेवर न मिळणे; त्यामुळे भरावा लागणारा दंड अशा समस्यांचा त्यात समावेश आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.

मोर्चे केवळ नावापुरतेच
या आधी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मोर्चा काढण्यात आला होता. विधानपरिषद सदस्य अनिकेत तटकरे यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या मोर्चात मिळालेली आश्‍वासने हवेत विरली आहेत. गेल्या वर्षी शिवसेनेच्या वतीने तत्कालीन जिल्हाप्रमुख रविभाऊ मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चा काढण्यात आला होता. पण आजतागायत काहीही प्रगती झाली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Avinash Jadhav: अविनाश जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल, 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Latest Marathi News Live Update : सुप्रिया सुळे अन् सुनेत्रा पवार यांना निवडणूक आयोगाची नोटीस

SCROLL FOR NEXT