pragya-singh
pragya-singh 
मुंबई

प्रज्ञासिंह यांना दिलासा नाही

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - मालेगाव बाँबस्फोट खटल्यातील प्रमुख आरोपी, खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना विशेष न्यायालयाकडून बुधवारी दिलासा मिळाला नाही. खटल्याच्या सुनावणीला कायम गैरहजर राहण्याची त्यांची मागणी न्यायालयाने फेटाळली.

प्रज्ञासिंह यांनी विशेष एनआयए न्यायालयात सुनावणीला गैरहजर राहण्यासाठी अर्ज केला होता. लोकसभेच्या कामानिमित्त संसदेत हजेरी लावायची आहे. त्याशिवाय मुंबई ते भोपाळ असा प्रवास प्रकृतीमुळे झेपत नाही. त्यामुळे खटल्याच्या सुनावणीला कायमचे गैरहजर राहण्याची परवानगी द्या, अशी मागणी त्यांच्या वतीने अर्जाद्वारे केली होती. ती न्यायालयाने अमान्य केली.

सध्या मालेगाव बाँबस्फोट खटल्याची सुनावणी विशेष एनआयए न्यायालयात सुरू आहे. या खटल्याला सर्व आरोपींनी आठवड्यातून किमान एक दिवस हजेरी लावावी, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. प्रज्ञासिंह यांना मुंबई उच्च न्यायालयाने प्रकृतीच्या कारणास्तव जामीन मंजूर केला आहे. एनआयएने दाखल केलेले आरोप हटवण्यासाठी त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISCE Result 2024 : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल जाहीर; एका क्लिकवर पाहा रिझल्ट

Viral Video: लाईक्ससाठी पेटवलं जंगल ! सोशल मीडियावर आगीचा व्हिडिओ अपलोड केल्या प्रकरणी तिघांना बेड्या

Manisha Koirala : उमरावजान साकारणार होती मल्लिकाजान ? मनीषाने सांगितली 18 वर्षांपूर्वीची गोष्ट

Harshit Rana KKR vs LSG : कारवाईनंतरही हर्षित राणा सुधरला नाही; बीसीसीआयला पुन्हा डिवचलं?

Latest Marathi News Update : नाशिकमध्ये कपालेश्वर हॉटेलच्या मागच्या बाजूला आग

SCROLL FOR NEXT