Manoj Jarange And Prasad Lad Esakal
मुंबई

Prasad Lad Reply Manoj Jarange: "...तर 288 उमेदवार उभे करा, आम्हीही बघू कसं पाडता"; प्रसाद लाड यांचं जरांगेंना आव्हान

भाजपच्या आमदारांना पाडण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं जाहीर विधान केलं होतं.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी नुकतेच भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्यावर सडकून टीका केली होती. तसंच भाजपच्या आमदारांना पाडण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं जाहीर विधान केलं होतं. त्यांच्या या विधानावर आता खुद्द प्रसाद लाड यांनी जरांगेंना प्रतिआव्हान दिलं आहे.

प्रसाद लाड म्हणाले, "आमचे बंधू मनोजदादा यांनी प्रवीण दरेकरांवर शिवराळ भाषेत टीका केली. आज त्यांनी सगळ्या सीमा पार केल्या आहेत. मनोजदादांना मी तुम्हाला सांगू इच्छितो, जर पडायचं आहे तर 288 उमेदवार उभे करा, आम्हीही बघू कसं पाडता"

प्रत्येकाचं रक्त लाल असतं. दरेकर मराठा आहेत का? असं तुम्ही विचारता. पण आम्ही मराठे आहोत की नाही याचं सर्टिफिकेट आम्हाला तुमच्याकडून नकोय. आम्ही तुमच्या सत्यपरिस्थितीवर बोललो तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही. फडणवीसांनी दिलेलं आरक्षण तुम्हाला मान्य नाही का? कोर्टात महाविकास आघाडीनं आरक्षण टिकवलं नाही हे मान्य आहे का? असा सवालही यावेळी लाड यांनी जरांगेंना विचारला.

तुमच्यावर कुणी गुन्हा दाखल केला आणि त्यातही तुम्ही फडणवीसांना गोवणार असाल तर ते बोलणं योग्य नाही. त्या प्रकरणाशी फडणवीसांचा संबंध नाही. फडणवीस आणि दरेकरांसाठी वापरलेली भाषा सहन करणार नाही. आमच्यावर संस्कार आहेत, तुम्ही शिव्या देऊनही मी शिव्या दिल्या नाहीत. पण हे तुम्ही सुरूच ठेवलं तर आम्हालाही या भाषेत बोलावं लागेल, असा इशारा लाड यांनी जरांगेंना दिला आहे.

जरांगे हे सध्या निजामशाहीकडं आणि मोगलाईकडे जात आहेत. जरांगे यांनी 'लाडकी बहीण योजने'ला विरोध केला, त्यांना महिलांचं चालणारं घर बंद करायचं आहे का? महाविकास आघाडीचे ऐकून तुम्ही हे करताय का? असा सवालही यावेळी लाड यांनी उपस्थित केला. लहान भावाला जर सरकार पैसे देत असेल, दोन कोटी मराठ्यांना याचा फायदा होत असेल. तर त्याचा त्रास तुम्हाला आहे का? त्यांनी 288 उमेदवार उभे करावेत, विधिमंडळात येऊन आरक्षणासाठी आमच्या साथीने लढाई करावी. जरांगे जी भाषा बोलत आहेत, त्यातून शरद पवार यांच्या पाठीशी असल्याच्या वास येतो, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agricultural News : सरकारी धोरणानं कांदा उत्पादकांना रडवलं, भारताच्या निर्यात महसुलात ११०० कोटींची घट; बांगलादेश-पाकिस्तानने साधली संधी

T20 World Cup: झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाने केला मोठा बदल; मॅच विनर खेळाडू संघात सामील

T20 WC, IND vs PAK: जावई असला म्हणून काय झालं? भारताविरुद्धच्या पराभवानंतर आफ्रिदी चिडला, थेट तिघांच्या हकालपट्टीची मागणी

Latest Marathi News Update : महाशिवरात्रीला बोकड कापल्याने ग्रामस्थ आक्रमक, जालना महामार्गावर ठिय्या आंदोलन; २ तास वाहतुकीचा खोंळबा

Satara : गुरुजी हे वागणं बरं नव्हं! 'व्हॅलेंटाइन डे'ला विद्यार्थीनीलाच प्रपोज; वर्गातून बाहेर बोलवत पकडला हात

SCROLL FOR NEXT