education training sakal media
मुंबई

प्रथम संस्थेचा ५० गावांमध्ये नवोपक्रम: विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे

सकाळ वृत्तसेवा

विक्रमगड : विक्रमगड तालुक्यातील ५० गावांमध्ये कोरोनाच्या कालावधीपासून प्रथम एज्युकेशन फाऊंडेशनच्या (pratham education foundation) स्वयंसेवकांमार्फत विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे (education training) देण्यात येत आहेत. विद्यार्थांचे (students) शैक्षणिक नुकसान होऊ नये व गावात शैक्षणिक वातावरण टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक गावातून युवक-युवती, माता-पालक यांची निवड करून स्वयंसेवक (volunteers) नेमण्यात आले.

त्यांना भाषा आणि गणित विषयांचे तसेच रेडीनेस कॅम्प याविषयी प्रशिक्षण प्रत्यक्ष व झूम कॉलद्वारे देण्यात आले. प्रत्यक्ष गावोगावी, प्रत्येक पाड्यात स्वयंसेवक वर्ग १ ते २ तास तेथील सोयीनुसार घेण्यात येत आहेत. गावातील मुलांना भाषा विषयात चित्रावरून गोष्ट तयार करणे, चौदाखडी वाचन, खेळ, विविध विषयांवर लेखन करता येणे तसेच मुलांना मनोरंजन पद्धतीने खेळ घेण्यात येत आहेत.

गणित विषयामध्ये संख्या वाचन, बेरीज-वजाबाकी, वस्तूंच्या साह्याने अभ्यास घेणे, त्याचबरोबर आकारांची ओळख, खेळ, इत्यादी घटक घेण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना प्रथमचे प्रशांत गवळे, लक्ष्मण हाडळ तसेच इतर सहकारी यांच्या मार्गदर्शनाने सर्व गावांत स्वयंसेवक वर्ग घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पक्षात खदखद! नेतृत्वावर थेट प्रश्न अन्...; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भावनिक पोस्ट चर्चेत, काय म्हणाले?

जमीन, जागेची खरेदी-विक्री आता कोणत्याही तालुक्यात! खरेदी-विक्री व्यवहारातून राज्याच्या तिजोरीत ५८,६७३ कोटी; ३१ मार्चपर्यंत सुट्टीतही सुरु राहणार कार्यालये

सोने-चांदीच्या भावात अचानक वाढ! युद्धानंतर सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक, सोनं ५५००ने तर चांदी ११००० रुपयांनी महाग

Karad News : कऱ्हाड - चिपळुण मार्गावरील अवजड वाहतुक बंद; महामार्गाच्या कामासाठी दोन महिने वाहतुकीत बदल

खरातचं कुटुंब परदेशात पलायनाच्या तयारीत? पतीचे कोट्यवधींचे व्यवहार माहिती नाहीत, पत्नीची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT