मुंबई

वीज ग्राहक मेळावे होऊ देणार नाही; प्रविण दरेकर यांचा सरकारला इशारा

कृष्ण जोशी

मुंबई ः वाढीव वीजबिलांबाबत निर्णय घेण्यासाठी सत्तारुढ तसेच विरोधकांच्या लोकप्रतिनिधींची संयुक्त समिती नेमावी, अशी मागणी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. अन्यथा वीजग्राहक मेळावे होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. 

या प्रश्नावर राज्य सरकार आणि उर्जामंत्री गेले चार महिने आश्वासने देऊन टोलवाटोलवी करत आहे. त्यामुळे आधीच कोरोनाने नाडलेल्या ग्राहकांना सर्वप्रथम दिलासा द्या, असेही दरेकर यांनी सांगितले आहे. 

महाविकास आघाडी सरकारने वीज बिल सवलतीबाबत यू-टर्न घेतला आहे. कोरोना काळात वीज बिल माफीची लोकप्रिय घोषणा केली. परंतु आता वाढीव वीज बिलातून ग्राहकांना दिलासा मिळणार नाही, मीटर रिडिंगप्रमाणे आलेली बिलं ग्राहकांनी भरलीच पाहिजेत, असे ऊर्जामंत्र्यांनी जाहीर केले आहे. ही वीजबिले चुकीची असून ती वाढीव जादा रकमेची दिली आहेत. त्यामुळे यासंदर्भात सत्यशोधनासाठी सत्तारूढ व विरोधी पक्षाच्या सदस्यांची समिती नेमावी. त्यातूनच सत्य बाहेर येईल, असेही दरेकर म्हणाले. 

जनताच झटका देईल शेलार यांची टीका
वाचाळवीर उर्जामंत्री आधी वीजबिलात सवलत देतो असे म्हणाले आणि आता शब्द फिरवला. अनैतिकतेतून जन्मलेल्या आणि राज्याला अराजकतेकडे नेणाऱ्या या सरकारला जनताच झटका देईल, अशी टीका भाजप आमदार आशीष शेलार यांनी ट्वीटद्वारे केली आहे.

Pravin Darekar warns not to allow electricity consumers to meeting

-------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सुट्टी देणे बंधनकारक आहे का? काय सांगतो कायदा

Maharashtra Din 2024 : वर्ल्ड फेमस आहेत महाराष्ट्रातील 'हे' खास पदार्थ, एकदा चव चाखाल तर प्रेमात पडाल.!

Udayanraje Bhosale : यशवंतराव चव्‍हाण यांना भारतरत्‍न द्या ; उदयनराजे, कऱ्हाडच्या सभेत मोदींना देणार निवेदन

MS Dhoni Cyber Scam : 'मी वावरात आहे, पाकीट घरी विसरलोय, 600 रूपये पाठव...' धोनीचा मेसेज आला असेल तर सावधान! Scam Alert

Loksabha Election: उत्तर मध्य मुंबईत काँग्रेस विरुद्ध काँग्रेस? नाराजांना गळाला लावण्याचे भाजपकडून प्रयत्न

SCROLL FOR NEXT