मुंबई

धक्कादायक! लाॅकडाऊन वाढवल्याची घोषणा ऐकून पुजाऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा

अंधेरी : देशभरात लाॅकडाऊन 3 मेपर्यंत वाढवणार असल्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी  केली. त्यामुळे आलेल्या नैराश्यातून कांदिवली पश्चिमेतील एका 35 वर्षीय पुजाऱ्याने मंदिरातच आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. 

कृष्णा पुजारी असे पुजाऱ्याचे नाव आहे. त्यांना कर्नाटकमधील मंगळूर, उडपी या आपल्या मूळ गावी जायचे होते; मात्र लाॅकडाऊनमुळे त्यांना जाता येत नव्हते. बऱ्याच वर्षांपासून ते कांदिवलीतील इराणी वाडी येथील दुर्गा देवीच्या मंदिरात मुख्य पुजारी होते. मंगळवारी (ता. 14) सायंकाळी त्यांनी मंदिरातच गळफास लावून आत्महत्या केली. माहिती मिळताच कांदिवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुजारी यांना शताब्दी रुग्णालयात दाखल केले.  रुग्णालयात डाॅक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. पुजारी यांना कर्नाटकमधील आपल्या मुळ गावी जाता न आल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली, अशी माहिती कांदिवली पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पांडकुळे यांनी दिली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT