mumbai high court sakal media
मुंबई

२ वर्ष अंडासेलमध्ये, तरुणाच्या मानसिक आरोग्याची चाचणी करण्याचे HC चे आदेश

सुनिता महामुनकर

मुंबई : कारागृहात असलेल्या अंडा सेलमध्ये (Anda cell) तब्बल दोन वर्षाहून अधिक काळ ठेवण्यात आलेल्या आरोपींच्या मानसिक आरोग्याची चाचणी (Mental health test) करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai high court) दिले आहेत. आरोपी इम्रान उर्फ मेहंदी नासिर शेख याला दोन वर्षे चार महिने और कारागृहातील अंडा सेलमध्ये ठेवण्यात आले होते. सर्वसाधारणपणे अंडा सेलमध्ये चौदा दिवस आरोपींना कायद्याने ठेवता येते. त्यामुळे शेखच्या पत्नीने एड रुपेश जयस्वाल यांच्या मार्फत औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

त्यापूर्वी त्यांनी कारागृह अधिक्षकांना अर्ज करून त्याला नियमित कारागृहात हलविण्याची विनंती केली होती. मात्र ही मागणी अमान्य करण्यात आली. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात विधी सेवा केंद्रात निवेदन दाखल केले आणि न्यायालयाने ती याचिका म्हणून मान्य केली. अंडा सेलमध्ये कायम राहिल्यामुळे मी माणसांशी बोलायचे कसे हेच विसरून गेलो आहे आणि सतत मला भास होत असतात, असे शेखने पत्नीला सांगितले आहे.

तो दहशतवादी नाही आणि अंडरवर्ल्डशी संबंधित नाही, आणि कारागृह नियमांचा भंगही केलेला नाही. त्यामुळे मला इथे का ठेवले आहे असा प्रश्न याचिकेत शेखने उपस्थित केला आहे. न्या व्ही के जाधव आणि न्या एस सी मोरे यांच्या खंडपीठाने याबाबत, धक्कादायक, असे आश्चर्य व्यक्त केले आहे. तातडीने आरोपीला अंडा सेलमधून हलवावे, त्याची तीन वैद्यकीय तज्ञांसह वैद्यकीय- मानसिक तपासणी करावी आणि नियमित कारागृहात त्याला ठेवावे, असे निर्देश खंडपीठाने दिले. राज्याच्या ग्रुह विभाग सचिव, पोलीस अधिक्षकांना न्यायालयाने नोटीस बजावली असून अंडासेलबाबत खुलासा करण्याचे निर्देश दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मार्च, एप्रिलचा हप्ता जमा झाला नाही, काळजी नसावी! कधी जमा होणार असे करा चेक?

सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ, ३ दिवसात ३ रुपयांनी झाला महाग

Latest Marathi News Live Update : विदर्भ, मराठवाड्याला उष्णतेच्या लाटेचा तर कोकणात पावसाचा इशारा

‘मामाच्या गोव्याला जाऊया’ चे ठेका धरायला लावणारे टायटल साँग प्रदर्शित; अवधूत गुप्तेंच्या आवाजात स्वरबद्ध

Maharashtra Voter List: राज्यात एक कोटी मतदार वगळणार ? 'एसआयआर'मध्ये मुंबई, ठाणे, पुण्यात सर्वाधिक मतदार बाद होण्याचा अंदाज!

SCROLL FOR NEXT