मुंबई - टिळक रुग्णालयाच्या परिसरात बिनधास्तपणे रुग्णवाहिका उभ्या करून त्यांचे चालक तिथेच बेकायदा ठाण मांडून बसतात.
मुंबई - टिळक रुग्णालयाच्या परिसरात बिनधास्तपणे रुग्णवाहिका उभ्या करून त्यांचे चालक तिथेच बेकायदा ठाण मांडून बसतात. 
मुंबई

खासगी रुग्णवाहिका चालकांचा ‘बाजार’!

नेत्वा धुरी

मुंबई - महापालिकेच्या सायन येथील टिळक रुग्णालयाच्या परिसरात खासगी रुग्णवाहिका चालकांनी बाजार मांडला आहे. रुग्णांकरिता रुग्णालयातर्फे मोफत रुग्णवाहिकेची सुविधा असतानाही खासगी सेवा देणाऱ्या या चालकांनी ही सेवाच ‘हायजॅक’ केली आहे. अवास्तव भाडे आकारून ते रुग्णांच्या नातेवाइकांची लूट करीत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 

रुग्णाला दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्याकरिता किंवा उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू झाल्यास महापालिका रुग्णालयाकडून मोफत रुग्णवाहिका दिली जाते. मात्र, टिळक रुग्णालय परिसरात खासगी रुग्णवाहिका चालकांनी रुग्णांच्या नातेवाइकांची लूट सुरू केली आहे. तब्बल दोन हजार रुपयांपासून रुग्णवाहिकेचे भाडे आकारले जात आहे. रुग्णालयातील सुरक्षारक्षकांच्या नाकावर टिच्चून हा अर्थपूर्ण व्यवहार सुरू आहे. यामुळे रुग्णालयाची सुरक्षितताही धोक्‍यात आल्याची चर्चा सुरू आहे.

टिळक रुग्णालयाच्या शवागृहाबाहेर सर्रास खासगी रुग्णवाहिका उभ्या असतात. ‘सकाळ’च्या पाहणीत मंगळवारी हा प्रकार उघड झाला. साई प्रसाद ॲम्ब्युलन्स सर्व्हिसेस आणि आयआयसी चॅरिटेबल ॲम्ब्युलन्स या दोन खासगी रुग्णवाहिका तेथे उभ्या होत्या. यापैकी साई प्रसाद ॲम्ब्युलन्स सर्व्हिसेसचे मालक सुभाष बिनधास्तपणे शवागृहाबाहेरच खुर्ची टाकून ‘गिऱ्हाईक’ टिपण्यात दंग होते. येथून एखाद्या रुग्णाला नायर रुग्णालयात दाखल करण्यासाठी ते २२०० रुपये भाडे घेतात, अशी माहिती खुद्द त्यांनीच ‘सकाळ’ला दिली. त्यांच्यासोबत त्यांचे दोन सहकारी होते. या दोन्ही रुग्णवाहिकांना रुग्णालय परिसरात पार्किंगला परवानगी नसल्याचे आम्हाला माहीत आहे, अशी कबुलीही सुभाष यांनी दिली.

खासगी रुग्णवाहिकांना पालिका रुग्णालय परिसरात मज्जाव आहे. या रुग्णवाहिकांचे चालक अवाजवी भाडे आकारतात. हा प्रकार त्वरित थांबवावा, अशी सूचना रुग्णालयाच्या सुरक्षा विभागाला केली आहे. 
- डॉ. जयश्री मोंडकर, अधिष्ठाता, टिळक रुग्णालय, सायन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : स्वाती मालीवाल प्रकरणी विभव कुमार यांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

Hair Care Tips : केसांसाठी फायदेशीर आहे हेअर स्पा, घरीच कसा करायचा ते जाणून घ्या!

Aye Haye Oye Hoye Viral Song: जे गाणं ऐकल्यानंतर नेटकऱ्यांनी कानावर ठेवले हात, त्याचं ओरिजनल व्हर्जन आहे भन्नाट

Indian Team Coach : द्रविड, लक्ष्मणनंतर ऑस्ट्रेलियाच्या या दिग्गजाचाही नकार; हेड कोच निवडताना बीसीसीआयची वाढणार डोकेदुखी?

Narayana Murthy: आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे नोकऱ्यांवर काय परिणाम होणार? नारायण मूर्तींनी दिले उत्तर

SCROLL FOR NEXT