Puranpoli sakal media
मुंबई

ठाणे : यंदाच्या होळीला महागाईचा रंग; पुरणपोळी, साखरमाळा महागल्या

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : होळी सणाला (Holi Festival) पुरणपोळ्यांना विशेष मागणी असते. होळीला पुरणपोळीचे नैवेद्य तसेच साखरमाळांनी सजवण्याची परंपरा असल्याने होळी आणि धूलिवंदनाच्या (Dhulivandan festival) दिवशी सर्वांच्याच घरातून खमंग पदार्थांचा सुवास दरवळत असतो. मात्र यंदा पुरणपोळी (puranpoli rates increases) आणि साखरमाळा तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या जिन्नसांच्या किमतींमध्ये वाढ झाल्याने पुरणपोळी ५ रुपये, तर साखरमाळ ५ ते १० रुपयांनी महागल्या (inflation) आहेत. त्यामुळे यंदाच्या होळीला महागाईचा रंग चढला आहे.

होळीनिमित्त गृहिणी घरी पुरणपोळी बनवत असल्या तरी घर आणि नोकरी अशी दुहेरी जबाबदारी सांभाळणाऱ्या महिला रेडिमेड पुरणपोळीला पसंती देतात. कोरोना साथीमुळे गेली दोन वर्षे होळी आणि धूलिवंदन साजरा करण्यावर निर्बंध होते. त्यामुळे होळीचा सण सर्वत्र साधेपणाने साजरा झाला. रेडिमेड पुरणपोळ्यांनाही विक्रेत्यांच्या अपेक्षेप्रमाणे हवी तशी मागणी मिळाली नव्हती; मात्र यंदा कोरोना आटोक्यात येऊन निर्बंध शिथिल झाल्याने होळी आणि धूलिवंदन साजरा करण्यासाठी सर्वत्रच उत्साहाचे वातावरण आहे.

पुरणपोळी बनवण्यासाठी लागणारी चणाडाळ, गूळ, मैदा, घरगुती गॅस आदींच्या किमतीमध्ये वाढ झाल्याने रेडिमेड पुराणपोळ्या महागल्या आहेत. गेल्या वर्षी ठाणे शहरात लहान पुरणपोळ्या प्रतिनग २० ते २५; तर मोठ्या पुरणपोळ्या ३० रुपयांपर्यंत विकल्या जात होत्या. यंदा त्यांमध्ये ५ रुपयांची वाढ होऊन लहान पुरणपोळ्या प्रतिनग २५ ते ३० तर मोठ्या पुरणपोळ्या ३५ रुपयांपर्यंत विकल्या जात आहेत.

लहान साखरमाळ २० ते ३० रुपये

१) लाकूड, पेंढा, शेणीपासून तयार करण्यात येणाऱ्या होळीला सजवण्यासाठी रंगीबेरंगी आणि विविध आकाराच्या साखरमाळा वापरल्या जातात. यंदा साखरमाळांच्या किमतीतही गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रतिमाळ ५ रुपयांची वाढ झाली आहे. तसेच कामगारांची मजुरी वाढली असून, होळीनिमित्त साखरमाळांना अधिक मागणी असल्याने किमतीतही ५ ते १० रुपयांची वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
२) मागील वर्षी लहान आकाराची एक साखर माळ १५ रुपयांनी विकली जात होती; तर मोठ्या आकाराची साखरमाळ २५ ते ३० रुपयांनी विकली जात होती; परंतु होळीनिमित्त मागणी वाढल्याने शहरातील बाजारपेठेत लहान साखरमाळ २० ते ३० रुपये आणि मोठ्या माळेची ४० रुपयांपर्यंत विक्री होत आहे. तसेच प्रतिकिलो साखरमाळा २०० रुपयांपर्यंत विकल्या जात आहेत.


पुरणपोळी बनवण्यासाठी लागणाऱ्या जिन्नसांच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे पूर्वीच्याच किमतींमध्ये पुरणपोळ्यांची विक्री करणे परवडणारे नाही. यंदा प्रतिनग पुराणपोळीवर ५ रुपयांची वाढ केलेली आहे. किमती वाढूनही ग्राहकांकडून पुरणपोळीसाठी येणाऱ्या ऑर्डरचा ओघ चांगला आहे.
- चित्रा कणकोसे, पुरणपोळी विक्रेत्या.

साखरमाळांना ग्राहकांकडून यंदा मागणी अधिक असली तरी साखरमाळांचा अधिक माल अजून अपेक्षेप्रमाणे बाजारपेठेत दाखल झालेला नाही. वाढती मागणी आणि महागाईमुळे साखरमाळांच्या किमतीतही ५ ते १० रुपयांची वाढ झालेली आहे.
- राज पतवान, साखरमाळ विक्रेता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT