Rahul Gandhi Rahul Gandhi
मुंबई

राहुल गांधी यांचा मेळावा पुढे ढकलला; नवीन तारीख लवकरच

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : काँग्रेसच्या १३७ व्या स्थापना दिनानिमित्त शिवाजी पार्कवर मंगळवारी (२८ डिसेंबर) राहुल गांधी (rahul gandhi) यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. मात्र, राज्यात ओमिक्रॉनचे रुग्ण वाढत असल्याने हा मेळावा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती माहीत भाई जगताप (bhai jagtap) यांनी दिली.

राज्यावर ओमिक्रॉनचे संकट ओढवले आहे. यामुळे राज्य सरकारने जाहीर केलेल्या सूचनांचे पालन करीत काँग्रेसचा वर्धापनदिन (Congress anniversary) साजरा केला जाईल. आता हा कार्यक्रम तेजपाल ऑडिटोरीयममध्ये होणार असल्याचे भाई जगताप यांनी सांगितले. तसेच राहुल गांधी यांच्या मेळाव्याची पुढची तारीख लवकरच कळवली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

आम्ही सरकारकडे मेळाव्यासाठी १५ दिवसांपासून मागणी करीत होतो. मात्र, सरकारकडून उत्तर न मिळाल्याने आम्ही न्यायालयात गेलो होतो. न्यायालयात मेळावा घेण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून दाद मागितली होती. ९ ऑगस्ट रोजी मुंबई महापालिका आयुक्त आणि राज्य सरकारकडे पत्र पाठवत सभेची परवानगी मिळावी याची मागणी केली होती असेही भाई जगताप म्हणाले.

मेळावा पुढे ढकलल्याचे राहुल गांधी यांच्या कार्यालयाला कळवले आहे. राहुल गांधी यांची सभा पुढे शिवाजी पार्क (Shivaji Park) येथे नक्की होईल. ओमिक्रॉनचा धोका पाहता तेजपाल ऑडिटोरीयममध्ये काँग्रेसचा स्थापना दिन साजरा केला जाईल, असेही भाई जगताप म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians फ्रँचायझीच्या संघाने ट्रेंट बोल्टला रिलीज केले; राशिद खान, निकोलस पूरन, कागिसो रबाडा संघात...

Bombay High Court: सेवानिवृत्त शिक्षकांना मोठा दिलासा! मुंबई उच्च न्यायालयाचे ‘काल्पनिक वेतनवाढ’ मंजूर करण्याचे आदेश, नोशनल इन्क्रिमेंट’ मंजूर, पेन्शन वाढणार

दोन हजार रुपयांच्या UPI पेमेंटवर किती अतिरिक्त शुल्क लागणार? हा नियम नेमका कुणासाठी? जाणून घ्या...

Cockroch Janta Party: दिपकेच्या घरी कोअर कमिटीची बैठक, रणनिती ठरणार

Latest Marathi News Live Update : पुण्यात विमानानगरमध्ये झीशान हॉटेलमध्ये आगीची घटना

SCROLL FOR NEXT