Rahul Narvekar sakal
मुंबई

Rahul Narvekar: पाणीपुरवठ्यामुळे मुंबईकर हैराण, विधानसभा अध्यक्ष घेणार विशेष बैठक

Mumbai Latest Update: शुक्रवारी बैठक घेण्याचे विधानसभा अध्यक्षांचे आदेश

सकाळ वृत्तसेवा

Mumbai Water Problem: मुंबईत कमी दाबाने आणि अपुऱ्या पाणी पुरवठ्याच्या तक्रारी वाढत असून मुंबईकर हैराण झाले आहेत. याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपल्या दालनात शुक्रवारी तातडीची बैठक बोलावली आहे.

आज विधानसभेत आमदार अँड आशिष शेलार यांनी आपल्यावांद्रे पश्चिम विधानसभा क्षेत्रातील खार दांडा, गझदरबांध आणि वांद्रे परिसरातातील पाणी पुरवठ्याच्या तक्रारी विधानसभेत मांडल्या. मुंबई महापालिकेत सत्ताधाऱ्यांनी मुंबईकरांना 24 तास पाणी देण्याचे आश्वासन दिले होते प्रत्यक्षात दोन तास ही पाणी मिळत नाही.

वांद्रे पश्चिम विधानसभा क्षेत्रात 24 तास पाणी पुरवठ्याचा पायलट प्रकल्प राबविण्यात आला तो पुर्ण अपयशी ठरला त्यामुळे आता एक तासभर ही पाणी मिळत नाही त्यामुळे रहिवाशांमध्ये असंतोष आहे.

मुंबईच्या सगळ्याच भागात याबाबत तक्रारी असल्याकडे आमदार आशिष शेलार यांनी लक्ष वेधले. त्याला मुंबईतील अन्य आमदारांनी पाठींबा दिला व मुंबईचे आमदार आक्रमक झाले.

याची गंभीर दखल घेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुंबई महापालिका जल अभियंत्यांनी तातडीने मुंबईतील पाणी पुरवठ्याची माहिती संबधित मंत्र्यांमार्फत सादर करण्याचे निर्देश दिले तसेच शुक्रवारी आमदार महापालिका अधिकारी आणि संबंधित मंत्री यांची बैठक विधानभवनात आपल्या दालनात घेण्यात येईल, अशी घोषणा राहुल नार्वेकर यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-New Zealand FTA: 20 ऑक्टोबरपासून दारू होणार स्वस्त! भारत-न्यूझीलंड FTA मुळे तुम्हाला काय फायदा?

Tempo Bike Accident : भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पोने दोन मोटारसायकलला पाठीमागुन उडविल्याने एक जणाचा मृत्यू; तर एकजण जखमी

Marathi News Live Updates: अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमात दोनशेहून अधिक महिलांचा सहभाग

Pitru Paksha 2026: यंदा पितृ पंधरवडा कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या महत्त्वाच्या तिथी

Marathwada Drought : पावसाने पाठ फिरवली; शेतकरी हवालदिल;सोयाबीनला पाणी देण्याची धडपडही निष्फळ; आर्थिक संकट गडद

SCROLL FOR NEXT