पर्यावरणाच्‍या जनजागृतीसाठी झटणारा अनिलकुमार सैनी.
पर्यावरणाच्‍या जनजागृतीसाठी झटणारा अनिलकुमार सैनी. 
मुंबई

पर्यावरणाच्‍या जनजागृतीसाठी सायकल भ्रमंती

सकाळ वृत्तसेवा

रसायनी : सुदृढ शरीर व सुंदर निसर्गासाठी सायकलचा वापर हा एक उत्तम पर्याय आहे. आरोग्य, पर्यावरण संवर्धन व इंधन बचतीचा संदेश व जनजागृती जनमानसात पसरविण्यासाठी रसायनी येथील रोटरी क्‍लब ऑफ पाताळगंगा पुरस्कृत रोटरॅक्‍ट क्‍लब अध्यक्ष अनिलकुमार सैनी यांनी पर्यावरणाच्या जनजागृतीसाठी गुरुवारी रसायनी येथून सायकल फेरी काढली.

रसायनीतील वासांबे मोहोपाडा येथून सकाळी नऊ वाजता सायकल फेरीला प्रारंभ झाला. या वेळी शुभेच्छा देण्यासाठी रोटरी क्‍लब ऑफ पाताळगंगाचे अध्यक्ष ऋतुजा भोसले, सचिव गणेश काळे, सदस्य नागेश कदम, सुनील भोसले, देवेन्द्र महिंद्रेकर, सुशांत उचील, डॉ. लेखा उचील, शेखार याडापली आदी उपस्थित होते.  सायकल फेरी पनवेल, कल्याण, कर्जत, लोणावळा आणि पुणे अशी २३० किलोमीटर अंतर कापत जाणार आहे.

भेट घेणाऱ्यांना क्‍लबच्या वतीने तुळशीचे रोप देण्यात येणार आहे. तसेच वाटेत कल्याण आणि लोणावळा येथे मुक्काम होणार आहे. तिसऱ्या दिवशी पुणे येथे फेरीची सांगता होणार आहे. तसेच रोटरॅक्‍ट क्‍लबचे अनिल कुमार सैनी आणि इतरांनी रसायनीत पावसाळ्यात सुरुवातीला वृक्षारोपणासाठी चांगला पुढाकार घेतला आहे. 

‘झाडे लावा, आणि जगविण्‍याचा संकल्‍प करा’... त्‍याचबरोबर प्‍लास्‍टिक पिशव्‍या आणि बाटल्‍या पर्यावरणासाठी हानिकारक असल्‍याने प्‍लास्‍टिक पिशव्‍या आणि बाटल्‍याचा वापर टाळावा, असाही संदेश या सायकल फेरीद्वारे देण्‍यात येणार असल्‍याची माहिती रोटरी क्‍लब ऑफ पाताळगंगाचे अध्यक्ष ऋतुजा भोसले यांनी दिली. सायकलचा वापर हा आरोग्‍य, पर्यावरण संवर्धन तसेच इंधन बचतीसाठी महत्त्‍वाचा असल्‍याने जास्‍तीत जास्‍त वापर करण्‍याचे आवाहन करण्‍यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 Updates: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 60.74 तर महाराष्ट्रात 53.90 टक्के मतदान

Explained: EVM जाळल्यावर, तोडफोड केल्यावर शिक्षा काय? निवडणूक आयोगाचे कडक कायदे जाणून घ्या...

ECI Directs X : भाजपची 'ती' आक्षेपार्ह पोस्ट तातडीनं हटवा! निवडणूक आयोगाचे ट्विटरला आदेश

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गोळीबार करत हल्लेखोर पैसे घेऊन पसार

Suryakumar Yadav Video: प्रेम हे! शतक करत मुंबईला जिंकवल्यानंतर सूर्याचा मैदानातून स्टँडमध्ये बसलेल्या पत्नीला व्हिडिओ कॉल

SCROLL FOR NEXT