संग्रहित
संग्रहित  
मुंबई

अपंगांना मतदानासाठी आयोगाचा आधार

सकाळ वृत्तसेवा

महाड : अपंगांना मतदानाचा हक्क बजावणे सोपे व्हावे यासाठी प्रशासनाने अपंगांसाठी साधने, वाहने आणि स्वयंसेवक तैनात केले आहेत. यामुळे मतदान केंद्रावर येणाऱ्या अपंगांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही. 

दुर्गम भागातील मतदान केंद्र दूर अंतरावर असल्याने अपंग मतदानासाठी बाहेर पडत नाहीत. त्यामुळे मतदान करण्याची प्रबळ इच्छा असूनही हे मतदार मतदानापासून दूर राहतात. त्यामुळे त्यांना प्रवाहात आणण्यासाठी निवडणूक आयोगाने प्रयत्न सुरू केले आहेत. या वेळच्या विधानसभा निवडणुकीतही अपंगांना विनासायास आणि मोकळ्या वातावरणामध्ये मतदान करता यावे याकरिता प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे.

महाड मतदारसंघामध्ये २ हजार १११ अपंग मतदार आहेत. यापैकी १०६ अंध मतदार आहेत. १ हजार ४७० अस्थिव्यंग मतदार, १०७ दृष्टिदोष असलेले मतदार, २२४ मूकबधिर, १३ बहुविकलांग; तर १९१ मतिमंद अशा विविध प्रकारातील अपंग मतदारांचा यात सहभाग आहे. यामध्ये या मतदारांना मतदान केंद्रावर आणण्यासाठी २२० गाड्यांची सोय करण्यात आली आहे. ९१ केंद्रांवर हे अपंग मतदान करणार आहेत. 

अपंगांसाठी ७६ व्हिलचेअरची सोय करण्यात आलेली आहे. ९ डोलींची सोय या ठिकाणी करण्यात आलेली आहे. अंध मतदारांना मतदान करता यावे याकरिता १०६ ब्रेलशिट्‌स तयार करण्यात आलेल्या आहेत. अपंगांना मतदान केंद्रावर ये-जा करण्याकरता त्यांच्यासोबत ३७९ स्वयंसेवकही सज्ज ठेवण्यात आलेले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT