माणगाव : मोर्ब रोडवर स्टेट बॅंकेसमोर रस्त्यावर बेकायदा पार्किंग केली जात आहे. त्‍यामुळे येथे वाहतूक कोंडी होते.
माणगाव : मोर्ब रोडवर स्टेट बॅंकेसमोर रस्त्यावर बेकायदा पार्किंग केली जात आहे. त्‍यामुळे येथे वाहतूक कोंडी होते.  
मुंबई

माणगावात वाहतूक कोंडी

सकाळ वृत्तसेवा

माणगाव : रायगड जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण म्हणून माणगाव ओळखले जाते. तालुक्‍याचे ठिकाण असल्याने येथे नेहमीच नागरिकांची गर्दी असते. दिवेआगर, हरिहरेश्‍वर, श्रीवर्धन ही प्रेक्षणीय स्थळे जवळ असल्याने पुणे-मुंबई येथून येणारे पर्यटकही माणगावमधूनच जातात. वाढते शहरीकरण, रस्त्यांची कामे, अरुंद रस्ते, जागोजागी उघड्या गटारांमुळे येथे वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. त्यात रस्त्यावर बेकायदा दुचाकी, कार आणि अन्य वाहनांमुळे वाहतूक कोंडीत भरच पडत असून पादचाऱ्यांना चालणेही कठीण झाले आहे. 

शहरात मोर्ब रोड परिसरात रस्त्याची कामे सुरू आहेत. त्यामुळे येथे वाहतूक कोंडी नेहमीची झाली आहे. तसेच हायवे, कचेरी रोड, निजामपूर रोड, अन्य शहरातील रहदारीच्या ठिकाणी वाहने पार्किंग केल्याने येथेही वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. दिवेआगर, हरिहरेश्‍वर, श्रीवर्धन ही प्रेक्षणीय स्थळे जवळ असल्याने पुणे-मुंबई येथून येणारे पर्यटकही माणगावमधूनच जातात. मात्र जागोजागी पडलेले खड्डे, रस्त्यालगतची वाहनांच्या पार्किंगमुळे येथून प्रवास करणे पर्यटकांसाठी जिकीरीचे झाले आहे. 

वाहतूक विनाविलंब व सुरळीत होण्यासाठी प्रत्येकांनी जबाबदार नागरिक म्हणून आपली वाहने योग्य ठिकाणी पार्किंग करण्याची आवश्‍यकता असल्याचे खांदाड येथील रहिवाशी परशुराम शेडगे यांनी सांगितले. माणगाव हे रायगड जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे. शहरात वाहनांची नेहमीच वर्दळ असते. पार्किंगची सुविधा नसल्यामुळे जिथे जागा मिळेल तिथे वाहनचालक गाड्या पार्क करीत असल्यामुळे अडथळा निर्माण होत असल्याचे प्रवासी रमेश वरणकर यांनी सांगितले. 

माणगाव शहरात हातगाडी, तसेच बेकायदा टपऱ्यांमुळे गाड्या पार्क करण्यास जागाच मिळत नाही. त्यामुळे खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना नाईलाजास्तव गाड्या बाजारात रस्त्याच्या कडेला उभ्या कराव्या लागत असल्याचे ग्राहक संतोष शिंदे यांनी सांगितले. बेकायदा वाहन पार्किंग करणाऱ्या वाहनचालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येत असून अशा वाहनचालकांकडून दंड वसूल करण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलिस हवालदार विशाल येलवे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT