माथेरान : रेल्वेस्थानकातील पिटलाईनचे काम अजून बाकी आहे. हे काम पूर्ण करण्‍याचे काम सुरू आहे.
माथेरान : रेल्वेस्थानकातील पिटलाईनचे काम अजून बाकी आहे. हे काम पूर्ण करण्‍याचे काम सुरू आहे.  
मुंबई

मिनी ट्रेन शटल सेवा सुरू होण्याची अफवाच

सकाळ वृत्तसेवा

माथेरान : अतिवृष्टीमुळे ९ ऑगस्टपासून बंद असलेल्या मिनी ट्रेनची शटल सेवा ३० नोव्हेंबरपासून सुरू होणार असल्याची चर्चा होत आहे. ही केवळ अफवा असल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले असून, त्यावर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे.

या वर्षी माथेरानमध्ये ८००० मिलिमीटर इतका विक्रमी पाऊस झाला. पावसामुळे रेल्वेमार्गाचे नुकसान झाल्याने नेरळ-माथेरान मिनी ट्रेन एक वर्षासाठी व शटल सेवा अनिश्‍चित काळासाठी बंद ठेवण्यात आली आहे. मिनी ट्रेन व शटल सेवा सुरू करण्यासाठी माथेरानवासीयांनी आंदोलने केली. त्यामुळे मध्य रेल्वेने शटल सेवा लवकर सुरू करण्यासाठी माथेरान स्थानकात पिटलाईन बनवण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे. या पार्श्‍वभूमीवर, मिनी ट्रेनची शटल सेवा ३० नोव्हेंबरपासून सुरू होणार असल्याची चर्चा माथेरानमध्ये होत आहे. 

दरम्यान, पिटलाईनचे काम अद्याप अपूर्ण असल्यामुळे ३० नोव्हेंबरला मिनी ट्रेनची शटल सेवा सुरू करण्याची घोषणा केलेली नाही, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी स्पष्ट केले. त्यामुळे अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. 

घाटरस्त्याची दुरुस्ती युद्धपातळीवर
जोरदार पावसामुळे घाटरस्त्यावर रेल्वे रुळांखालील जमीन वाहून गेली असून, काही ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. मध्य रेल्वेने दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर सुरू केली आहेत. घाटरस्ता दुरुस्त झाल्यानंतर चाचणी म्हणून एक रिकामी गाडी माथेरानकडे रवाना करण्यात येईल. चाचणी यशस्वी झाल्यानंतर मिनी ट्रेन सुरू करण्याचे संकेत मध्य रेल्वेने पूर्वीच दिले आहेत.

पिटलाईनच्या कामात अडथळे
माथेरान स्थानकात डिझेल लोकोशेड बनवण्यासाठी पिटलाईनचे काम सुरू आहे. वाहनांना बंदी असल्याने सर्व सामान वाहून न्यावे लागते. त्यामुळे पिटलाईनची सामग्री वेळेवर उपलब्ध होत नसल्याने कामात अडथळे येत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT