janjira fort
janjira fort sakal
मुंबई

Raigad : जंजिरा किल्‍ल्‍यावर पर्यटकांचा हिरमोड

सकाळ वृत्तसेवा

मुरूड : राजपुरी येथील जंजिरा किल्ला पाहण्यासाठी वर्षभर देश-विदेशातील पर्यटक येतात; मात्र पुरातत्त्व सर्व्हेक्षण विभागाने जंजिरा किल्‍ल्‍यावर विनापरवाना मार्गदर्शकाचे (गाइड) काम करणाऱ्या स्थानिक युवकांना बंदी घातल्यामुळे जवळपास १५० जणांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. उन्हाळी सुट्या सुरू झाल्‍याने सध्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. गाइडअभावी किल्‍ल्‍यावर उन्हातान्हात नुसतीच पायपीट होत असल्‍याने पर्यटकांमधूनही नाराजी व्यक्‍त होत आहे.

राजपुरी येथील जंजिरा पर्यटक संस्थेमार्फत १६ बोटीमधून किल्ल्यावर सकाळी ९ ते संध्याकाळी ५ पर्यंत वाहतूक केली जाते. प्रत्येक बोटीमध्ये एक मार्गदर्शक असतो. हे मार्गदर्शक धक्क्यावरूनच ऐतिहासिक जंजिरा किल्‍ल्‍याची माहिती सांगण्यास सुरुवात करीत असल्‍याने प्रथमच पाहणाऱ्या व्यक्तीची उत्कंठा शिगेला पोहोचते.

जंजिऱ्याचा पूर्वजांकडील ऐकीव इतिहास हे गाइड पर्यटकांना सांगतात. अनेकांच्या उदरनिर्वाहाचे हे एकमेव साधन आहे. मात्र विनापरवाना मार्गदर्शक पर्यटकांची लूट करतात, खरा इतिहास सांगत नाहीत, अशा तक्रारी पुढे आल्याने त्‍यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे. वर्षभरापासून किल्ल्यात येणारे पर्यटक अधिकृत व वस्तुस्थितीदर्शक माहिती न मिळाल्याने निराश होऊन परतत आहेत.

सुमारे ३२५ वर्षांपूर्वी बांधलेल्या अजोड वास्तुशिल्पाचा नमुना असलेला जंजिरा किल्‍ला आजही पर्यटक तसेच इतिहास अभ्यासकांना कोड्यात टाकतो. २२ बुरूज, २२ एकरवर विस्‍तारलेल्‍या किल्‍ल्‍यातील दगडांचे चिरे सध्या झिजले असले, तरी त्यात भरलेला चुनामिश्रित प्लास्टर आजही शाबूत आहे. किल्‍ल्‍यात दोन जलाशय, कलाल बांगडीसारख्या पंचधातूंनी मढवलेल्या तोफा किल्ल्याच्या गतवैभवाच्या आठवणींना उजाळा देतात. किल्‍ल्‍याच्या जवळ जात नाही, तोपर्यंत प्रवेशद्वार नजरेस पडत नाही.

बाबासाहेब पुरंदरेंचे दशकापूर्वी विनम्र आवाहन

पुरातत्त्व विभागाच्या दृष्टीने जंजिरा आणि पद्मदुर्ग हे दोन्ही किल्ले राष्‍ट्रीय ठेवा असले, तरी प्रेरक साहित्याच्या दृष्टीने ते एक महाकाव्य आहे. सरकारने दोन्ही किल्ल्यांकडे लक्ष देण्याचे विनम्र आवाहन दशकापूर्वी इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे यांनी केले होते.

मनमानी पैसे उकळत असल्‍याच्या तक्रारी

जंजिरा किल्ला हे एक राष्ट्रीय स्मारक असून येणाऱ्या पर्यटकांकडून मार्गदर्शक मनमानी पैसे उकळतात. मार्गदर्शकांसाठी जी रक्‍कम निश्‍चित केली जाईल, ती मान्य असल्‍याचे जंजिरा पर्यटक संस्थेमार्फत २०१९ मध्ये कळवण्यात आले होते.

त्यानंतर दोन वर्षे कोरोनात गेली. मध्यंतरी जंजिरा किल्‍ल्‍यात मार्गदर्शक असलेले आणि पूर्वी किल्ल्यात वास्तव्यास असलेल्यांच्या कामाची जबाबदारी पुढील पिढीला सोपवावी, अशी मागणी स्थानिक बोटधारकांकडून होत असल्‍याची माहिती पुरातत्त्व सर्वेक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

एमटीडीसीतर्फे श्रीवर्धन येथे जंजिरा पर्यटक संस्थेतर्फे १२ युवकांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. त्यांना प्रशस्तीपत्रांसह ओळख पत्रेही दिली आहेत; मात्र पुरातत्त्व खात्याकडून त्‍यांना मार्गदर्शन म्‍हणून ठेवण्यात दिरंगाई होत आहे. शिवाय स्थानिक युवकांना प्रशिक्षकाही दिले जात नाही. त्‍यामुळे त्‍यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

- इस्माईल अली अदमाने, अध्यक्ष, जंजिरा पर्यटन संस्‍था, राजापुरी

सुविधांची अपेक्षा :

पुरातत्त्व खात्याकडून प्रत्येक पर्यटकामागे २५ रुपये शुल्क आकारले जाते; परंतु त्या बदल्यात पर्यटकांना काय मिळते, असा प्रश्‍न पर्यटकांकडून विचारण्यात येत आहे. किल्ल्याची जुजबी साफसफाई सोडली, तर अन्य कोणत्‍याही सुविधा मिळत नसल्याचे पर्यटकांकडून सांगण्यात येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan: सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरण! एका आरोपीचा पोलीस कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न, प्रकृती गंभीर

Monsoon Season : यंदा 'मॉन्सून' लवकरच हजेरी लावणार; हवामानतज्ज्ञांचा अंदाज, उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने

Changpeng Zhao: बिनन्सच्या संस्थापकाला तुरुंगवास; जगातील सर्वात श्रीमंत क्रिप्टो एक्सचेंजमध्ये नेमकं काय झालं?

नाशिकचा सस्पेन्स संपला ! हेमंत गोडसे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर, शांतिगिरी महाराजांना धक्का

Latest Marathi News Live Update: मनेका गांधींनी भरला उमेदवारी अर्ज

SCROLL FOR NEXT