kapil-patil.
kapil-patil. 
मुंबई

कल्याणकरांनो, थोडा त्रास सहन करा!

सकाळवृत्तसेवा

कल्याण -  कल्याण रेल्वे स्थानकाचा विमानतळाच्या धर्तीवर विकास करण्याचा रेल्वे मंत्रालयाचा मानस आहे. यासाठी तांत्रिक मंजुरी प्रकियेला वेळ लागत असल्याने नागरिकांनी थोडा त्रास सहन करावा, असा सल्ला भिवंडीचे भाजप खासदार कपिल पाटील यांनी कल्याणकरांना दिला आहे. त्यांच्या हस्ते कल्याण रेल्वे स्थानकातील तिकीट घराचे उद्‌घाटन सोमवारी झाले.

या वेळी स्टेशन मास्तर प्रदीपकुमार दास, कल्याण भाजप शहर अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, नगरसेवक दया गायकवाड, अर्जुन भोईर, सचिन खेमा यांच्यासह मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी, रेल्वे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. या वेळी पत्रकारांशी बोलताना खासदार कपिल पाटील यांनी विमानतळाच्या धर्तीवर कल्याण रेल्वे स्थानकाचा विकास करण्याचा रेल्वे मंत्रालयाचा मानस असल्याचे सांगितले. यासाठी ९६० कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली; मात्र प्रस्ताव प्रक्रियेला वेळ लागत असल्याचे नमूद केले. वासिंद रेल्वे स्थानक परिसरातील फूटओव्हर ब्रिजच्या (एफओबी) कामाला सुरुवात झाली आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात बदलापूर रेल्वे स्थानकातील होम प्लॅटफॉर्मचा भूमिपूजन सोहळा पार पडणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आणखी काही वर्षे मोदी सरकारचीच सत्‍ता असेल, असा दावाही त्‍यांनी केला.

सकाळ'ला सोशल मीडियावर लाईक करा :
'सकाळ' फेसबुक : @SakalNews
'सकाळ' ट्विटर : @eSakalUpdate
इन्स्टाग्राम : @esakalphoto

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Gurucharan Singh : गुरुचरण सिंहने रचलाय बेपत्ता असल्याचा कट ? ; पोलिसांनी व्यक्त केला संशय

Suryakumar Yadav: भारताचा 'मिस्टर 360' सूर्यानं 'बेबी एबी'ला शिकवला कसा खेळायचा सुपला शॉट, पाहा Video

Latest Marathi News Live Update : "चित्रा वाघ यांनी माझी माफी मागावी," अनभिनेते राज नयानी यांचा इशारा

SCROLL FOR NEXT