मुंबई

Railway News: पश्चिम रेल्वेवर २२ अनारक्षित विशेष गाड्या; प्रवाशाना मिळणार दिलासा

मुंबई ते गोरखपूर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे |Passengers traveling between Mumbai and Gorakhpur will get a big relief

सकाळ वृत्तसेवा

Raiway News: रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने वांद्रे टर्मिनस-गोरखपूर स्थानकांदरम्यान विशेष २२ अनारिक्षित विशेष गाड्या चालविण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे मुंबई ते गोरखपूर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक 05054 वांद्रे टर्मिनस - गोरखपूर स्पेशल वांद्रे टर्मिनस येथून दर शनिवारी रात्री ९.१५ वाजता सुटेल आणि सोमवारी सकाळी ०६.२५ वाजता गोरखपूरला पोहोचेल. ही ट्रेन २० एप्रिल २०२४ ते २९ जून २०२४ पर्यंत धावणार आहे.

त्याचप्रमाणे ट्रेन क्रमांक ०५०५३ गोरखपूर - वांद्रे टर्मिनस स्पेशल गोरखपूरहून दर शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता सुटून वांद्रे टर्मिनसला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ६ वाजता पोहोचेल.

ही ट्रेन १९ एप्रिल २०२४ ते २८ जून २०२४ पर्यंत धावेल. या दोन्ही गाडयांना बोरिवली, पालघर, वापी, वलसाड, सुरत, वडोदरा, रतलाम, शामगढ, भवानी मंडी, कोटा, गंगापूर सिटी, आग्रा फोर्ट, तुंडला, कानपूर सेंट्रल, ऐशबाग, बादशाह नगर, गोंडा, बस्ती आणि खलीलाबाद स्थानकावर थांबेल. दिशानिर्देश ट्रेन क्रमांक ०५०५४ ला बायणा स्थानकावर अतिरिक्त थांबा असेल.(Palghar, Vapi, Valsad, Surat, Vadodara, Ratlam, Shamgarh, Bhawani Mandi, Kota, Gangapur City, Agra Fort, Tundla, Kanpur Central, Aishbagh, Badshah Nagar, Gonda, Basti and Khalilabad)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या भावात मोठा बदल, जाणून घ्या काय आहे आजची किंमत ?

Dhurandhar Trailer Launch : रणवीरच्या ‘धुरंधर’चा ट्रेलर येतोय!

बिहारमध्ये नव्या सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त अन् ठिकाण ठरलं, पंतप्रधान मोदी राहणार उपस्थित

Latest Marathi Breaking News : 'नुकतेच स्थापन झालेल्या सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण केली पाहिजेत'- उद्योगपती रॉबर्ट वड्रा

Suhana Swasthyam 2025 : ‘फूडफार्मर’ रेवंत यांचे ‘स्वास्थ्यम्’मध्ये व्याख्यान; खाद्यपदार्थांवरील लेबल्स वाचायचे कसे, हे कळणार सोप्या शब्दांत

SCROLL FOR NEXT