मुंबई

रेल्वे अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या 

सकाळवृत्तसेवा

मुंबई - कुलाबा येथील बधवार पार्क वसाहतीतील इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून 58 वर्षीय महिलेने आत्महत्या केली. नीता अनिलकुमार अगरवाल असे मृत महिलेचे नाव असून त्यांचे पती अनिलकुमार अगरवाल पश्‍चिम रेल्वेचे मुख्य अभियंता (यांत्रिक) आहेत. 

बधवार पार्क येथील एल ब्लॉकमध्ये सकाळी 11 च्या सुमारास ही घटना घडली. खाली पडलेल्या नीता यांना तातडीने जगजीवन राम रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्‍टरांनी तपासणी करून नीता यांना मृत घोषित केले. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. उच्च रक्तदाबाचा त्रास असल्यामुळे नीता तणावाखाली होत्या. याप्रकरणी कुलाबा पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांचे पत्नी अनिलकुमार अगरवाल हे भारतीय रेल्वे सेवेच्या 1981 मधील तुकडीतील अधिकारी आहेत. त्यांनी 2015 मध्ये पश्‍चिम रेल्वेच्या यांत्रिकी विभागाचे मुख्य अभियंता म्हणून कार्यभार स्वीकारला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT