मुंबई

कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी रेल्वेचाही प्रस्ताव; वाचा आताची सर्वात मोठी अपडेट

प्रशांत कांबळे



मुंबई : गणपती उत्सवासाठी चाकरमान्यांना कोकणात सोडण्यासाठी मध्य रेल्वेने रेल्वे मंडळाकडे प्रस्ताव पाठवला आहे. लवकरच या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसे, झाल्यास कोकण मार्गावरून रेल्वेच्या सुमारे 208 फेऱ्या धावतील. 

कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी सध्या फक्त एसटीची सुविधा आहे. त्यानंतर आता कोकण रेल्वे मार्गावर विशेष रेल्वे चालवण्यासाठी राज्य सरकार आणि मध्य रेल्वे आग्रही आहे. तसा प्रस्ताव केंद्रीय गृह विभाग आणि रेल्वे मंडळाकडे पाठविण्यात आला आहे. मध्य रेल्वे मार्गाचे जनसंपर्क अधिकारी कार्यालय आणि मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांना यासंबंधीच विचारले असता अद्याप रेल्वे मंडळाने मान्यता दिली नसून, मान्यता मिळाल्यानंतर अधिकृत घोषणा केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर 11 आॅगस्ट ते 3 सप्टेंबरपर्यंत या फेऱ्या धावण्याची शक्यता आहे.

प्रवाशांची तपासणी होणार
कोकणासाठी रेल्वेच्या सुमारे 208 फेऱ्या धावणार आहे. आरक्षित तिकिट असलेले प्रवासीच या गाड्यांमधून प्रवास करु शकतील.  गाड्यांमध्ये प्रवाशांना अन्नपदार्थ, ब्लॅंकेट आदी पुरविण्यात येणार नाही. तसेच, प्रवाशांना रेल्वे स्थानकांवर 3 तास आधी यावे लागणार असून, प्रवाशांची तपासणी करूनच प्रवाशांना गाडीत बसविले जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.

----------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Leaders Join Congress : ममता बॅनर्जींना मोठा धक्का! १०० हून अधिक नेते-कार्यकर्त्यांनी पक्ष सोडला; यावेळी भाजप नाही तर कॉंग्रेसमध्ये प्रवेश

आजचे राशिभविष्य - 29 सप्टेंबर 2026

आरोग्य‘चेतना’ : स्पायनल ट्युमरची अत्याधुनिक शस्त्रक्रिया

Maharashtra Weather : पावसाची पुन्हा एन्ट्री! राज्यातील ८ जिल्ह्यांना येलो अलर्ट; तुमच्या भागात कसे असेल हवामान ?

US-China Trade Deal : अमेरिका-चीन ट्रेड वॉरला ब्रेक! ६० अब्ज डॉलरच्या व्यापारावर मोठा निर्णय, भारताची चिंता वाढली ?

SCROLL FOR NEXT