railway  sakaln
मुंबई

Railway: उरण-खारकोपर रेल्वे मार्ग सुरु होईना; नागरिक त्रस्त

Chinmay Jagtap

उरण रेल्वे मार्ग सुरू करण्यासाठी रेल्वे विभागाच्या सर्व चाचण्या होऊनही वर्षभर रखडलेला उरण-खारकोपर रेल्वे मार्ग सुरू करा या मागणीसाठी गुरुवारी (ता. ७) काँग्रेसच्या वतीने गाजर दाखवा आंदोलन करण्यात आले. या वेळी रेल्वे आणि मोदी सरकारचा निषेध करण्यात आला. हा रेल्वेमार्ग सुरू न झाल्याने नागरिक, विद्यार्थ्यांसह व्यावसायिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

जनतेसाठी सर्वांत स्वस्त व सुरक्षेचा चांगला प्रवास म्हणून रेल्वे सेवेकडे पाहिले जाते. मुंबई जवळ असूनसुद्धा उरण तालुक्यातील जनता रेल्वे सेवेपासून वर्षानुवर्षे वंचित राहिली आहे. सहा महिन्यांपूर्वी उरण ते खारकोपर रेल्वेची चाचणीसुद्धा झाली. मात्र, सहा महिने उलटूनही अद्याप उरण ते खारकोपर रेल्वे सेवा सुरू झाली नाही.

रेल्वेचे प्रशासनातर्फे रेल्वे सुरू होणार असल्याच्या तारखा वारंवार बदलण्यात येत आहेत. जनतेच्या समस्यांचा, भावनांचा विचार होत नसल्याने उरण तालुका व उरण शहर काँग्रेसने याबाबत आक्रमक भूमिका घेतली. काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा निषेध करण्यासाठी गुरवारी उरण रेल्वेस्थानकाच्या मुख्य गेटसमोर गाजर दाखवा आंदोलन करण्यात आले.

या वेळी महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यांक सरचिटणीस रेमंड लोवीयस, काँग्रेसचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष किरीट पाटील, राष्ट्र सेवादलाचे रायगड जिल्हा कार्याध्यक्ष वैभव ठाकूर, तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे, महिला तालुकाध्यक्ष रेखा घरत, माजी नगरसेवक बबन कांबळे, शहराध्यक्ष प्रकाश पाटील, शहराध्यक्ष अफशा मुकरी, देवीदास थळी आदींनी मनोगत व्यक्त करून रेल्वे सुरू होत नसल्याबाबत केंद्र व राज्य शासनाचा निषेध केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar: अखेर वेळ ठरली! नितीश कुमार राजीनामा देणार; तारीख आली समोर, बिहारमध्ये २० वर्षांनंतर बदलाची चाहूल

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Pune Accident: पुण्यात थरारक घटना! मद्यपी चालकाने तरुणाला फरफटत नेऊन चिरडले; हडपसर-सासवड रस्त्यावरील घटना, चालकाला अटक!

Mohol Crime: छळातून दुर्दैवी अंत; मोहोळमध्ये नवविवाहितेचा खून, नवरा व सासूला चार दिवसांची कोठडी!

तापमान ४२ अंशावर! ‘ही’ फळे खावा, नैसर्गिक पेये, आंबिल प्या; लहान मुलांची 'अशी' घ्या काळजी, वाचा...

SCROLL FOR NEXT