rain in mumbai thane suburban area disrupts routine work 
मुंबई

पुण्यात उघडला पण, मुंबई ठाण्यात बरसला (व्हिडिओ)

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : अवकाळी पावसाच्या हजेरीनं पुणेकरांना दोन दिवस दिलासा दिला असला तरी, आज सकाळपासून मुंबई आणि ठाणे परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. 
मुंबईसह उपनगर आणि ठाणे जिल्ह्यात आज, सकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली. सकाळची वेळ असल्यामुळं चाकरमान्यांची धावपळ झाली. उपनगरीय रेल्वे सेवेवर या पावसाचा किरकोळ परिणाम झाल्याची माहिती मिळत आहे. 

मुंबईत विशेषतः ठाणे शहर परिसरात पहाटेपासूनच दमदार पाऊस सुरू झाला. त्यामुळं कामानिमित्त मुंबईच्या दिशेने जााणाऱ्या रेल्वे आणि उपनगरीय वाहतुकीवर याचा परिणाम झाला. मध्य रेल्वेच्या रेल्वेस्थानकांवर गर्दीच्या वेळी पाऊस सुरू असल्याने काही ठिकाणी परिस्थिती आणखीनच बिकट झाली. ठाण्यासह डोंबिवली परिसरातही सकाळपासून पाऊस सुरू आहे. आज सकाळीपासूनच ठाणे शहरातील घोडबंदर रोड, नौपाडा, पाचपाखाडी ,कळवा या ठिकाणी  पावसाने हजेरी लावलेली आहे सकाळ पासून पडणाऱ्या पावसामुळे हवेत सुखद गारवा निर्माण झाला आहे तसेच शहरातील सखल भागात अद्याप तरी पाणी साचलेलं नाही.

दरम्यान, मध्य रात्रीपासून पालघर मध्ये परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली असून सकाळपासून पावसाची रिपरिप सुरूच आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या महा चक्रीवादळामुळे पालघरच्या पश्चिम किनारपट्टी लगतं तसेच पूर्व भागात परतीच्या पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे पालघर  शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास या अस्मानी संकटाने हिरावून घेतलाय . या पावसाचा फटका भात शेतीला बसल्यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. पावसाची शक्यता असल्यामुळे पालघरमध्ये शाळा-महाविद्यालयांना तीन दिवसांची सुटी यापूर्वीच जाहीर करण्यात आलीय. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan: पानिपतकार विश्वास पाटील ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष

Kamshet News : कामशेतमध्ये महामार्गालगत कचऱ्याचे ढीग,दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; व्यवस्थापनाअभावी गंभीर परिस्थिती

Maratha Reservation : मराठा आरक्षणावर सरकारमध्येच जुगलबंदी: भुजबळ-विखे पाटलांमध्ये मतभेद

Sangli Crime News : बड्या नेत्याच्या पीएचा त्रास, पंचायत समितीतील २७ वर्षीय अभियंत्याचा मृत्यू; कृष्णा नदीत मृतदेह सापडल्याने आरोप...

PCMC News : नवनगर विकास प्राधिकरणाच्या जमिनी द्या, पीएमआरडीएची मागणी; अतिक्रमणबाधितसह मोकळ्या जागा हव्यात

SCROLL FOR NEXT