Rain Update House collapsed due to heavy rain in Shahapur Elderly injured thane sakal
मुंबई

Rain Update: शहापुरात अतीवृष्टीने घर कोसळले; वयोवृद्ध जखमी

Latest Shahapur News: तात्काळ आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणी प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष वसंत पानसरे यांनी तहसीलदार कडे केली आहे | Rain Havoc in Thane House Collapses in Shahapur Elderly Injured

नरेश जाधव

Latest Thane Rain: शहापूर तालुक्यातील हजारे वेहलोळी गावात शनिवारी राञीच्या सुमारास अतिवृष्टीने घर कोसळून बुधा परसु जाधव वय.80 जखमी झाले आहेत. प्रसंगावधान राखून गावकऱ्यांनी मदत करून त्यांना बाहेर काढल्याने त्यांचा जीव वाचला.

गेल्या 10/12 दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने ठिकठिकाणी पूल,रस्ते व नाले भरून वहात असल्याने जनजीवन विस्कळीत केले असून ,शनिवारी रात्री पाऊस सुरू असताना 9 च्या सुमारास वेहलोलई गावातील बुधा परसु जाधव यांच राहत घर अंगावर कोसळलं जोरात आवाज झाल्याने सर्व गावकरी धावून आले.

घरात बुधा परसु जाधव हे आत असताना अटकून राहिले होते वेहळोली येथील तरुण विकी जाधव ,सागर जाधव, आनंद जाधव सह ग्रामस्थांनी या प्रसंगी घाव घेऊन 80 वर्षीय आजोबा बुधा जाधव यांना सुखरूप बाहेर काढले.

पूर्ण घर कोसळल्याने ते सद्या बेघर झाले असून त्यांना गावकऱ्यांनी आश्रय दिला असून बुधा जाधव यांना घरकुल मंजूर करून त्यांना शासनाने तात्काळ आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणी प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष वसंत पानसरे यांनी तहसीलदार कडे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT