मुंबई

परतीच्या पावसाचा मुंबईला पुन्हा दणका; चेंबूरमध्ये तासाभरात 57 मिमी पावसाची नोंद

समीर सुर्वे

मुंबई - पावसाने सायंकाळी मुंबईला मेघगर्जना आणि विजेच्या लखलखाटासह जोरदार दणका दिला. काही भागात पाणी साचल्याने परतीच्या मार्गावर असलेल्या नोकरदारांचे चांगलेच हाल झाले. सोमावरपर्यंत मुंबईसह ठाणे जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

पावसाने मागील काही दिवसांपासून दडी मारली मारली होती.मात्र,आज संध्याकाळी जोरदार पाऊस झाला. एक ते दीड तास झालेल्या पावसामुळे मुंबईत अनेक भागात पाणी भरले होते. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला.

सर्वाधिक पावसाचा फटका  उपनगरांना बसला. चेंबूर येथे संध्याकाळी 7 ते 8 या तासाभरात 57 मिमी पावसाची नोंद झाली.कॉटनग्रीन येथे या तासात 42 आणि दहिसर येथे 46 मिमी पावसाची नोंद झाली आहे. शनिवार सकाळी 8 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत पुर्व उपनगरात 23.54, पश्चिम उपनगरात 17.68 आणि शहर विभागात 187.07 मिमी पावसाची नोंद झाली आहे.तर, सोमवार पर्यंत मुंबई, ठाण्यासह संपुर्ण कोकणात मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे.

पावसामुळे रात्रीच्या वेळी वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. कुलाबा येथे कमाल 32 आणि किमान 27.अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.तर सांताक्रुझ येथे कमाल 

32.8 आणि किमान25.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.पुढील 48 तास तापमान याच पातळीवर राहाणार आहे.सोमावार पर्यंत वातावरण ढगाळ राहाणार असून रात्रीच्या वेळे मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

चेंबूर परिसरात पाणी भरले

शहरासह उपनगरात आज संध्याकाळी अचानक पाऊस पडल्याने चुनाभट्टी, कुर्ला, चेंबूर,आरसी मॉल, गोवंडी, विक्रोळी रेल्वे स्टेशन मार्गावरील सखल भागात पाणी साचल्याने काही ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. या मार्गावर पाण्याचा एवढा प्रवाह होता की नागरिकांना चालणे मुश्किल झाले होते. तर वाहनाचालकांना वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागत होती. काही बेस्ट, वाहने पाण्याच्या प्रवाहात कित्येक तास उभ्या होत्या. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.

---------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT