जिल्हा रुग्णालयात ‘अंधार’
जिल्हा रुग्णालयात ‘अंधार’ 
मुंबई

जिल्हा रुग्णालयात ‘अंधार’

प्रमाेद जाधव

अलिबाग : येथील जिल्हा रुग्णालयातील नेत्र शस्त्रक्रिया विभागातील आद्ययावत शस्त्रक्रिया केंद्रासाठी जिल्हा नियोजन विभागाच्या निधीतून तब्बल एक कोटी १० लाख रुपये खर्च करण्यात आले. त्यानंतरही हे केंद्र जूनपासून ठप्प आहे. पावसाळ्यात पाणी झिरपल्याने येथे बुरशी तयार झाल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे हे काम संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

जिल्हा रुग्णालयातील नेत्र रुग्ण विभाग २० खाटांचा पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र विभाग आहे. गेल्या वर्षी या ठिकाणी शस्त्रक्रिया केंद्र उभारण्यासाठी जिल्हा नियोजन विभागाकडून एक कोटी १० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. त्यानुसार येथे ट्रॉली, खुर्ची, इंजेक्‍शन ट्रॉली, मशीन अशी उपकरणे आणि साहित्य खरेदी करण्यात आले. त्याचबरोबर काही दुरुस्ती, सजावटीचीही कामे करण्यात आली. त्यानंतर त्याचे थाटामाटात १५ ऑगस्ट २०१८ रोजी उद्‌घाटन करण्यात आले; मात्र गेल्या पावसाळ्यात या विभागात गळती सुरू झाली. त्यामुळे भिंतींना बुरशी लागली. रुग्ण प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला असून ७ जून २०१९ पासून शस्त्रक्रियाबंद आहेत.

शेवग्याची शेंग १० रुपयांत 
https://www.esakal.com/mumbai/drumstick-10-rupees-243041

शस्त्रक्रिया केंद्रातील जंतूचे नमुने मुंबईतील हाफकिन प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. रुग्णालय प्रशासनाच्या बेजबाबदार कारभाराचा फटका येथील रुग्णांना बसला.
४०० रुग्ण प्रतीक्षेत जिल्हाभरातील रुग्ण अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात येतात; मात्र येथील शस्त्रक्रिया विभागात गळती लागली असल्याने तो बंद आहे. त्यामुळे सहा महिन्यांपासून ४०० रुग्ण शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत आहेत.

विजेच्या वापराबाबत निष्काळजी
जिल्हा रुग्णालयाच्या आवारात असलेले नेत्र विभाग बंद आहे. तरीही या इमारतीचे दिवे आणि अन्य उपकरणे सुरू असतात. त्यामुळे  या निष्काळजीपणाबाबत आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

नेत्र रुग्णांना चांगली सुविधा मिळावी म्हणून शस्त्रक्रिया केंद्र आद्ययावत करण्याचा प्रयत्न होता. त्यासाठी निधीही उपलब्ध झाला होता. त्याचा रुग्णांना उपयोग होत नसेल, तर संबंधित विभागाची चौकशी करण्यात येईल.
- सुनील जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी, रायगड

जिल्हा रुग्णालयातील नेत्र शस्त्रक्रिया विभागात पावसाचे पाणी झिरपले आहे. त्यामुळे काही महिन्यांपासून हा विभाग बंद आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे त्याची दुरुस्ती करण्यासाठी मागणी केली 
आहे. आठ ते १० दिवसांत रंगरंगोटी करून शस्त्रक्रिया सेंटर सुरू होईल.
- डॉ. अजित गवळी, 
जिल्हा शल्यचिकित्सक

आरोग्याच्या प्रश्‍नाकडे रुग्णालय प्रशासनाने गांभीर्याने पाहणे आवश्‍यक आहे. नेत्र शस्त्रक्रिया विभागाकडे झालेले दुर्लक्ष अक्षम्य आहे. 
-ॲड. राकेश पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणे..'' Video Viral

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: पंजाबचा कर्णधार सॅम करनने जिंकला टॉस, चेन्नई संघात दोन मोठे बदल; पाहा प्लेइंग-11

PM Modi Exclusive: क्लिनचिट मी दिलेली नाही.. भ्रष्टाचाराच्या लढ्यावर मोदी अजूनही ठाम, विरोधकांच्या प्रश्नाला थेट उत्तर

आणिबाणी नंतरच्या निवडणुकी नंतर वाळवा तालुक्याला लागली होती लॉटरी; नेमके काय घडले ?

Zapatlela 3 : 'झपाटलेला ३' मध्ये पुन्हा लक्ष्याच ? ; हॉलिवूडनंतर पहिल्यांदाच मराठीत प्रयोग

SCROLL FOR NEXT