मुंबई

आजपासून पुन्हा "लाव तो व्हिडिओ' 

सकाळवृत्तसेवा

मुंबई - संपूर्ण लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात केंद्रस्थानी आलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांचा धडाका मंगळवारपासून (ता. 23) सुरू होत आहे. ठाकरे यांच्या सभेतील "अरे लाव रे तो व्हिडिओ'ला राज्यभरातून प्रतिसाद मिळाला असतानाच त्यांच्या सभेतील ऑडिओ-व्हिडिओ चित्रीकरणाबाबत मतदारांमध्ये उत्सुकता आहे. 

लोकसभा निवडणुकीसाठी राज ठाकरे यांनी आतापर्यंत नांदेड, सोलापूर, इचलकरंजी, सातारा, पुणे आणि महाड येथे सभा घेतल्या आहेत. राज्यातील शेवटच्या टप्प्याचे मतदान 29 एप्रिल रोजी होत आहे. महाडनंतर राज ठाकरे यांची मुंबईत सभा पार पडणार आहे. काळाचौकी येथील शहीद भगतसिंग मैदानात उद्या सभा होणार आहे. मनसेने बुधवारी (ता.24) सभेची परवानगी मागितली होती, मात्र मनसेला एक दिवस आधी परवानगी मिळाली आहे. त्यामुळे राज्यातील काही भाग पिंजून काढल्यानंतर राज ठाकरे यांची तोफ आता मुंबईत धडाडणार आहे.  काळाचौकीतील सभेनंतर भांडूप, पनवेल व नाशिकला सभा होणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Pawar: रोहित पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडिओनंतर PDCC बँकेच्या मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल

Bidkin Crime News : धक्कादायक! भीशीचे व व्याजाचे पैसे न दिल्याने महिलेसह पाच मुलांचे अपहरण

Yuzvendra Chahal: ऋषभ पंतची विकेट चहलसाठी ठरली ऐतिहासिक! T20 मध्ये कोणत्याच भारतीयाला न जमलेला केला पराक्रम

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: दुसऱ्याच चेंडूवर राजस्थानला मोठा धक्का! जैस्वालला ४ धावांवरच झाला आऊट

SCROLL FOR NEXT