मुंबई

मनसेकडून उद्धव ठाकरेंची ब्रिटीश अधिकारी रँडशी तुलना

विराज भागवत

मुंबई: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी संपूर्ण लॉकडाउनचा इशारा दिला. 'हे बंद करा, ते बंद करा ही आपली भूमिका नाही. पण येणाऱ्या बिकट परिस्थितीवर वेळीच मात करण्यासाठी आतापासूनच प्रयत्न करावे लागतील. त्यामुळे आता जिंदगी, जान, उसके बाद काम या पद्धतीने जावे लागेल', असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. लोकांची मात्र सध्या मानसिकता वेगळी आहे. जर लॉकडाउन झालं तर आर्थिक गणितं बिघडतील आणि त्याचा थेट परिणाम आयुष्यावर होईल अशी भावना व्यक्त होत आहे. परंतु मुख्यमंत्री लॉकडाउनच्या निर्णयावर ठाम असल्याचे दिसत आहेत. याच मुद्द्यावरून मनसेचे संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांची तुलना ब्रिटीश अधिकारी रँड यांच्याशी केली.

१८९७ साली देशात प्लेगची साथ आली होती. त्यावेळी ब्रिटीशांची राजवट होती. लोक साथीच्या आजाराने जीव गमावत होते. पण तेव्हाचा ब्रिटीश अधिकारी रँड हा जनतेवर अन्याय-अत्याचार करत होता. जनतेची काळजी न करता केवळ आपले निर्णय जनतेवर लादण्याचे काम ब्रिटीश राजवटीत केले जात होते. त्याचाच दाखला देत संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. '१८९७ साली प्लेगची साथ आली त्यावेळी रँड ने लोकांवर कशाप्रकारचे अत्याचार केले याचा अनुभव राज्यातील जनता सध्याच्या काळात घेत आहेत', असं ट्वीट त्यांनी केलं.

दरम्यान, लॉकडाउन हा महाराष्ट्रातील जनतेला परवडणारा नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचाही लॉकडाउनला विरोध आहे हे मुख्यमंत्र्यांनी ध्यानात घ्यावे. आनंद महिंद्रा यांनी आरोग्य सुविधा वाढवण्याचा सल्ला दिला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी ५० डॉक्टर, नर्स, आरोग्यसेवक उपलब्ध करुन द्या, असे उत्तर दिले. मुख्यमंत्र्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की लोक स्वत:हून सरकारला मदत करायला म्हणून समोर आले. प्रादुर्भाव कमी झाल्यावर त्यांना कामावर काढून टाकलं. आता लोकांच्या मनातील विश्वासार्हता कमी झाली आहे. म्हणून तुम्हाला डॉक्टर, आरोग्यसेवक मिळत नाहीत, अशा शब्दात संदीप देशपांडे यांनी ठाकरे यांना सुनावले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Union Budget Impact on Bangladesh: मोदी सरकारने अर्थसंकल्पातून बांगलादेशच्या युनूस सरकारला दिला जबरदस्त दणका!

Latest Marathi News Union Budget 2026: अर्थसंकल्पात फक्त मोठे आकडे आणि पोकळ आश्वासने प्रत्यक्षात जनतेच्या हाती तूरी - हर्षवर्धन सपकाळ

Union budget 2026-27: अर्थसंकल्पात केंद्राचं लाडकं राज्य कोणतं? अनेक महत्त्वाकांक्षी योजनांचा संकल्प

Australia Open 2026: अल्काराजचेच वर्चस्व! जोकोविचविरुद्ध दणक्यात पुनरागमन करत पहिल्यांदाच कोरलं ट्रॉफीवर नाव

Union Budget 2026: 'या' लोकांसाठी अर्थसंकल्प ठरला अपूर्ण आशांची कहाणी; अपेक्षा काय होत्या, काय मिळाले? वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT