मुंबई- आज जर लोकमान्य टिळक असते तर ते गोपाळ गणेश आगरकरांना म्हणाले असते, की आजची परिस्थिती पाहता मला तुमचंच म्हणणं पटतंय; प्रथम समाज सुधारणा हव्यात मग स्वातंत्र्य! अशा आशयाचं व्यंगचित्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (ता. 21) रेखाटलं आहे.
राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा सध्याच्या परिस्थितीवर मार्मिक असं व्यंगचित्र रेखाटले आहे. हे व्यंगचित्र रेखाटताना त्यांनी सध्याच्या सामाजिक परिस्थीतीची दुर्दशा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. टेंबू, कराड येथे आगरकरांच्या पुतळ्याची विटंबना झाली या घटनेशी संबधित राज यांनी हे व्यंगचित्र काढले असून त्यांनी सध्या देशाला भेडसावत असलेल्या विविध समस्यांचा उल्लेख यामध्ये केला आहे.
बँकांना लुटून फरार झालेले उद्योगपती, शेतकरी आत्महत्या, महिलांवरील वाढते अत्याचार, शिक्षणाचा खालावलेला दर्जा, धार्मिक आणि जातीय संघर्ष, बेरोजगारी, बेजबाबदार प्रशासनामुळे कामगारांचे होत असलले हाल अशा विविध भीषण प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर दाखवत लोकमान्य टिळक आज असते तर समाजसुधारक आगरकरांच्या भूमिकेचं एका शतकानंतर समर्थन केलं असतं असं राज यांना व्यंगचित्रातून दाखवायचे आहे.
दरम्यान, लोकमान्य टिळक व गोपाळ गणेश आगरकर हे समकालिन स्वातंत्र्यपूर्व काळातील थोर समाजसुधारक होते. परंतु स्वातंत्र्याआधी लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांचे विचार थोडे वेगवेगळे होते. स्वातंत्र्य आधी हवे, अशी टिळकांची मागणी होती तर समाजसुधारणांना अग्रक्रम द्यावा असा आगरकरांचा आग्रह होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.