Raju Patil
Raju Patil sakal
मुंबई

Raju Patil: आनंद दिघे यांनी काम थांबवलेली मशीद झाली जीर्ण; मनसे आमदाराने वेधले लक्ष

शर्मिला वाळुंज

Thane Politics: दहिसर येथे आशिया खंडातील सर्वात मोठी इराणी मस्जिद बांधण्याचे काम 1993 साली हाती घेण्यात आले होते. मात्र तात्कालीन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी या मस्जिदच काम थांबवलं होत. सध्याच्या घडीला हि वास्तू जिर्ण झाली असल्याने तिचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे.

त्यानंतर ती वास्तू पाडण्यात यावी अशी मागणी मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्याकडे केली. त्या मागणीचा विचार करत पालकमंत्री देसाई यांनी तातडीने जिल्हाधिकाऱ्यांना सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मस्जिदचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

ठाणे येथे सोमवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीत मनसे आमदार राजू पाटील यांनी वरील मुद्दा उपस्थित केला. ठाणे जिल्ह्यात आशिया खंडातील सर्वात मोठ्या इराणी मस्जिदचे काम नव्व्दच्या दशकात सुरु करण्यात आले होते. दहिसर येथील 250 एकर जागेत हि मस्जिद बांधण्यात येत होती.

या मस्जिदच्या कामाला अनेक ठिकाणांहून आर्थिक पुरवठा मोठ्या प्रमाणात सुरु असल्याने काम देखील जलदगतीने सुरु होते. मात्र या मस्जिदला शिवसेनेचे तत्कालीन जिल्हा प्रमुख धर्मवीर आनंद दिघे यांनी विरोध केला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या मस्जिदच्या कामाला सन 1995 साली 99 वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. इराणच्या धर्तीवर ठाणे जिल्ह्यात हि मस्जिद बांधण्याचा निर्धार करण्यात आला होता. मात्र प्रखर विरोधामुळे हे बांधकाम थांबवण्यात आले होते. मध्यंतरी या मस्जिद परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास बसेस मधून लोक जात असल्याची माहिती समोर आली होती.

त्यामुळे आता हे आंदोलन हाती घेतलेल्या पक्षांचे दोन गट तयार झाले असून त्यांची न्यायालयात लढाई सुरु आहे. त्यामुळे या ज्वलंत प्रश्नाला आता मनसे आमदार राजू पाटील यांनी हात घातला असून पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करून तोडण्याची मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे. यावर पालकमंत्र्यांनी देखील सकारात्मक भूमिका घेतल्याने मस्जिद पाडकामाला लवकरच सुरुवात होईल अशी आशा असल्याचा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi: हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह परराष्ट्र मंत्र्याचा मृत्यू- रिपोर्ट

Shivam Dube : शिवम दुबेला लागले ग्रहण... T20 World Cupसाठी संघात निवड झाल्यानंतर 5 सामन्यात केल्या फक्त इतक्या धावा

Masala Omelette Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा मसाला ऑम्लेट, चवदारही लागणार अन् पोटही भरणार.!

Stock Market: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजार कसा असेल? पंतप्रधान मोदींनी वर्तवले भाकित

Maharashtra Lok Sabha Phase 5 Election : पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान! राजनाथ सिंह, राहुल गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

SCROLL FOR NEXT