मुंबई

प्रकल्पबाधित श्वानांना सिडकोची 'घरे'

सुजित गायकवाड

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या गाभाक्षेत्रातील स्थलांतरीत झालेल्या गावांमधील भटक्‍या श्‍वानांना अखेर हक्काचा निवारा मिळणार आहे. गावे विस्थापित झाल्यावर उघड्यावर पडलेल्या या श्‍वानांना सिडकोतर्फे तयार केल्या जात असलेल्या निवारा केंद्रात स्थलांतरीत केले जाणार आहे. सायन-पनवेल महामार्गालत असलेल्या आसुडगाव बसडेपोच्या शेजारी निवारा केंद्र तयार करण्यात आले आहे. हे केंद्र चालवण्यासाठी सिडकोतर्फे एका श्‍वान संस्थेची नियुक्ती केली जाणार आहे. 

पनवेल शहराच्या शेजारी गाढी नदीजवळ सुमारे ११०० हेक्‍टरवर तयार होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे पनवेल तालुक्‍यातील दहा गावे विस्थापित झाली आहेत. सुमारे तिन हजार कुटुंबांना घरेदारे आहेत त्याच परिस्थितीत सोडून जावी लागली आहेत. तर काहींनी घरे तोडून सिडकोच्या विविध योजनांचा लाभ घेतला आहे. गावे सोडल्यानंतर मात्र गावातील रस्त्यांवर व उकीरड्यांवर भटकणारी श्‍वान व मांजरे असे प्राणी गावातच राहीले आहेत. गावांमध्ये रोज दिसणारी माणसे दिसीनाशी झाल्याने या प्राण्यांनी मिळेल तिकडे आसरा घेण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र अन्नाच्या शोधात दाहीदिशा वणवण भटकूनही कुठेच जागा न मिळाल्यामुळे भटके श्‍वान ग्रामस्थांच्या स्थलांतरानंतही विमानतळ प्रकल्पाच्या सुरू असलेल्या कामांच्या ठिकाणी भटकताना दिसत आहेत.

गावे विस्थापित झाल्यामुळे या भटक्‍या जीवांचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. या प्राण्यांकरीता नवी मुंबई व पनवेल परिसरात श्‍वानांसाठी काम करणाऱ्या काही श्‍वानप्रेमी संस्थांनी भटक्‍या श्‍वानांचे पूर्नवसन करण्याचा प्रयत्न केला. तसेच काही संस्थांनी सिडकोकडे या भटक्‍या श्‍वानांचे पूर्नवसन करण्याची मागणी केली होती. त्याप्रमाणे आसुडगाव येथील काही वर्षांपूर्वी बंद पडलेले श्‍वान निवारा केंद्र पुन्हा सुरू केले जाणार आहे. या ठिकाणी श्‍वान निर्बिजीकरणाकरीता आवश्‍यक यंत्रणा तयार करण्याचे सिडकोमार्फत काम सुरू आहे. तसेच हे श्‍वान निवारा केंद्र चालवण्यासाठी सिडकोमार्फत एका संस्थेची नियुक्ती केली जाणार आहे. 


आसुडगाव बस डेपोच्या आवारात सिडकोचे जूने बंद पडलेल्या निर्बिजी केंद्रात निवारा केंद्र सुरू केले जाणार आहे. त्याकरीता सिडको तर्फे एका संस्थेची नियुक्‍ती केली जाणार आहे. सिडकोने निवीदा प्रक्रीया अंतिम टप्प्यात आहे. पुढील महिन्यात हे निवारा केंद्र सुरू होणार आहे. 
एन.आर परब, वरिष्ठ स्वच्छता अधिकारी, सिडको  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Latest Marathi News Update : पुलवामा येथे बोट उलटली, दोन जण बेपत्ता

RTE Admission : आरटीईनुसार २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाचे अर्ज भरण्याची प्रक्रिया तात्पुरती बंद

SRH vs LSG Live Score : पूरन अन् बदोनीनं लखनौला पोहचवलं 165 धावांपर्यंत

SCROLL FOR NEXT