recruiting Examination for 6205 posts did not got any job students allegation on health minister esakal
मुंबई

Mumbai News : भरतीसाठी वेळकाढू भूमिका; स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचा आरोग्यमंत्र्यांवर आरोप

आरोग्य विभाग गट ‘क’ व गट ‘ड’ साठी २०२१  मध्ये तब्बल ६,२०५ पदांसाठी परीक्षा झाली होती

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : आरोग्य विभाग गट ‘क’ व गट ‘ड’ साठी २०२१  मध्ये तब्बल ६,२०५ पदांसाठी परीक्षा झाली होती; परंतु परीक्षापूर्वीच उत्तरे बाहेर आल्याचे दिसून आल्यामुळे ही परीक्षा रद्द करण्यात आली होती.

त्यानंतर सहा महिन्यांत आरोग्य विभागाच्या सर्व जागा भरतो असे आश्वासन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिले होते. मात्र, त्यांनी आरोग्य पदभरतीसाठी ‘हाताची घडी, तोंडावर बोट’ अशी वेळकाढू भूमिका घेतल्याचा आरोप स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांनी केला आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात आरोग्य विभागाच्या गट ‘क’ परीक्षेसाठी २४ ऑक्टोबर २०२१ ला, तर गट ‘ड’ साठी ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी परीक्षा झाली होती; परंतु परीक्षापूर्वीच उत्तरे बाहेर आल्याचे दिसून आल्याने परीक्षा रद्द करण्यात आली होती.

मात्र, या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे समोर आल्याने तत्कालीन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही परीक्षाच रद्द केली. त्यानंतर या प्रकरणात काही लोकांना अटकदेखील झाली आहे; परंतु त्यानंतर लवकरच ही परीक्षा नव्याने घेण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, आज जवळपास दोन वर्षे होत आली, तरी या परीक्षेला मुहूर्त मिळत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.

ही परीक्षा रद्द करून जवळपास २० महिन्यांचा कालावधी लोटला आहे. तरीही सरकार याबाबत काहीही निर्णय घेत नाही. परीक्षा शुल्कापोटी कोट्यवधी रुपयांचा निधी राज्य शासनाला मिळाला आहे. परीक्षा कधी होणार, याकडे विद्यार्थी डोळे लावून बसले आहेत.

आरोग्य विभाग गटनिहाय जागा

  • गट क - २,७३९

  • गट ड - ३,४६६

  • एकूण जागा - ६,२०५

  • अर्ज दाखल केलेले एकूण विद्यार्थी - ८ लाख ६६ हजार

परीक्षा रद्द होऊन २० महिने होत आले आहेत; परंतु आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी परीक्षा होण्यासाठी कोणत्याही प्रकारची हालचाल केल्याचे दिसत नाही.

- महेश घरबुडे, स्पर्धा परीक्षा - समन्वय समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT