Recruitment  
मुंबई

Recruitment : प्राध्यापकांच्या जागा भरण्यास टाळाटाळ; महाविद्यालयांना १५ जूनपर्यंत मुदत, अन्यथा...

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी उच्च शिक्षण संचालनालयाने कार्यवाही सुरू केली असली तरी अनुदानित महाविद्यालयांनी मात्र त्याकडे दुर्लक्ष केले असल्याची बाब समोर आली आहे.

यामुळे संचालनालयाकडून या महाविद्यालयांना रिक्त जागा भरण्यासाठीचे प्रस्ताव दाखल करण्यासाठी १५ जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर जर प्रस्ताव दाखल करण्यात आले नाहीत तर थेट कारवाई केली जाणार असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली.

राज्यातील १२२ अनुदानित महाविद्यालयांमध्ये रिक्त असलेल्या ५२३ जागांसाठी मागील काही महिन्यांपासून ना-हरकत आणि मागणी प्रस्ताव दाखल केला नाही. या जागा भरण्यासाठी विभागाकडून वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली असतानाही त्यासाठी अनेक महाविद्यालयांनी दुर्लक्ष केले आहे. विशेष म्हणजे या रिक्त असलेल्या या जागा अनेक महत्त्वाच्या विषयाच्या आणि राखीव गटातील आहेत.

त्या भरण्यासाठी उच्च शिक्षण विभागाने परवानगी दिली दिली आहे; मात्र संस्थाचालक आणि संबंधित महाविद्यालय प्रशासनाकडून या जागा भरण्यासाठी दिरंगाई केली जात असल्याने त्यांना विभागाकडून अखेरची संधी देण्यासाठी आदेश जारी करण्यात आले आहेत.

गुणवत्तेवर परिणाम

पदभरतीसाठी पदे मान्य असलेल्या अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील रिक्त पदे अनेक वर्षांपासून भर‍ली गेली नसल्याने त्याचा शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम झाला आहे. त्यातच पटसंख्येत वाढ झालेली असतानाही रिक्त पदांची संख्याही वाढत आहे; मात्र अनुदानित महाविद्यालयांकडून ही पदे भरण्यासाठी दिरंगाई केली जात आहे;

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic Advisory : 'कॉक्रोच जनता पार्टी'चा आज मोर्चा! पुण्यात वाहतुकीत बदल, पर्यायी मार्ग कोणते?

Gold Rate Today: सोनं खरेदी करणाऱ्यांना अखेर दिलासा! आज सोन्याच्या भावात मोठी घसरण; 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील?

Krishnaraj Mahadik Rahul Gandhi : 'राहुल गांधींना जराही समज नाही, संसदेत आवाज उठवा, रस्त्यावर आंदोलन करून जनतेला वेठीस धरू नये'; कृष्णराज महाडिकांची टीका

Bombay High Court Alimony Ruling : पत्नीचे उत्पन्न पतीपेक्षा जास्त तर पोटगी नाही! मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतली, तरी हे आंदोलन थांबणार नाही; संजय राऊत यांचा मोदी सरकारला इशारा

SCROLL FOR NEXT