संग्रहित
संग्रहित 
मुंबई

पारसिक चौपाटी विस्थापितांचे पुनर्वसन रखडले 

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : शहराला चांगली चौपाटी मिळावी यासाठी रेतीबंदर येथील अतिक्रमण ठाणे महापालिकेकडून हटवण्यात आले आहे. येथील रहिवाशांना रेंटलमध्ये घरे देण्यात आली आहेत. त्याप्रमाणे येथील दुकानदारांनाही गाळे देण्यात येणार होते; मात्र हे गाळे अद्याप न मिळाल्याने या विस्थापितांनी महापौर नरेश म्हस्के यांची भेट घेत आपल्या व्यथा मांडल्या. त्यावर महापौरांनी पुढील आठवड्यात गृहमंत्री आणि महसूलमंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन त्यावर योग्य तो तोडगा काढला जाईल, असे आश्‍वासन त्यांनी दिल्याची माहिती नगरसेवक उमेश पाटील यांनी दिली. 

महापालिकेच्या पुढाकाराने पारसिक रेतीबंदर परिसरात चौपाटीचे काम सुरू करण्यात आले आहे; मात्र हे काम सुरू करण्यापूर्वी येथील अतिक्रमणावर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली होती. चौपाटीबाधितांचे पुनर्वसन करण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते, पण येथील सुमारे 103 गाळेधारकांचे पुनर्वसन अद्याप झालेले नाही.

याच पार्श्‍वभूमीवर महापौरांच्या दालनात आज उमेश पाटील, दशरथ पाटील यांच्यासोबत व्यापाऱ्यांनी भेट घेतली. या वेळी या गाळेधारकांना 500 चौरस फुटांचे गाळे मिळावेत, अशी मागणी करण्यात आली. तसेच 180 चौरस फुटांचे गाळे घेणार नसल्याचा इशाराही गाळेधारकांनी प्रशासनाला दिला आहे. 

मुळात या चौपाटीच्या विरोधात उच्च न्यायालयात दोन याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर हरित लवादाकडेही त्याची सुनावणी सुरू आहे. अशा वेळी येथे सुरू असलेले व्यवसाय बंद करून नवीन गाळा व्यवसायासाठी मिळत नसल्याने येथील गाळेधारक हवालदिल झाले आहेत. पालिकेने अजून कोणत्याही व्यापाऱ्याला गाळे दिले नसून महापालिका प्रशासन दिलेले आश्‍वासन विसरल्याचा आरोप नगरसेवक उमेश पाटील यांनी केला आहे. 

पाचशे फुटांचा प्रस्ताव 
पारसिक येथील रेतीबंदर चौपाटीच्या कामासाठी येथील स्थानिक नागरिकांनी आपल्या वर्षानुवर्षे कब्जे वहिवाटीच्या जागा देऊन मोलाचे योगदान दिले आहे. यामध्ये बहुतांश व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आज त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्‍न प्रलंबित आहे. या प्रश्‍नांवर चर्चा करताना महापौर नरेश म्हस्के यांनी ज्या ठिकाणी या विस्थापितांना जागा देण्यात येणार आहे, त्या ठिकाणी प्रशासनाने दिलेल्या आश्‍वासनानुसार 500 चौ. फुटांप्रमाणे नियोजन करण्यात यावे व यालगत असलेल्या दोन भूखंडांबाबत आवश्‍यक प्रस्ताव महासभेत सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT