मुंबई

धुरच धूर! उल्हासनगरकरांनी सोडला सुटकेचा निश्वास! जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला निर्णय...

दिनेश गोगी - सकाळ वार्ताहर

उल्हासनगर : उल्हासनगरातील स्मशानभूमीमध्ये तात्काळ 4 विद्युत दाहिन्या उपलब्ध करून देण्याचे निर्देश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना दिले आहेत. त्यामुळे कोव्हिड रुग्णांवर अंत्यसंस्कार करताना परिसरात पसरणाऱ्या धुरातून नागरिकांची सुटका होणार आहे. 

उल्हासनगर शहरात कोरोनामुळे मृत्यूच्या संख्येत वाढ होत असून आतापर्यंत 68 मृत रुग्णांवर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यातून निघणाऱ्या धुरामुळे नागरिक त्रस्त आहेत. रात्री बेरात्री धूर परिसरात पसरत असल्याने आपल्यालाही कोरोनाची लागण होणार तर नाही ना? अशी भीती नागरिकांच्या मनात आहे. 

त्या अनुषंगाने उल्हासनगरात असणाऱ्या 4 स्मशानभूमीमध्ये कोरोना मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी विद्युत दाहिन्यांची व्यवस्था करण्याची मागणी शिवसेना शहरप्रमुख व पालिकेतील सभागृहनेते राजेंद्र चौधरी यांनी पालकमंत्री शिंदे यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत शिंदे यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना 4 विद्युत दाहिन्या उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत.

---------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra: मान्सून जैसे थे! मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पावसाचा अंदाज; विदर्भात उष्ण लाटेचा इशारा

Shaktipeeth Highway Protest : शक्तिपीठ महामार्गाविरोधात हरकतींचा पाऊस; शेतकरी आक्रमक, ऐतवडे खुर्दमधील 182 एकर सुपीक जमीन होणार बाधित

SAFF Women Football: 'त्या' दोन पराभवांचा बदला घेणार? भारतीय महिला फुटबॉल संघासमोर बांगलादेशचे तगडे आव्हान; आजपासून थरार!

Pimpri: उद्योगनगरीत मेट्रोचा विस्तार कासवगतीने;उद्योगनगरीत मेट्रोचा विस्तार कासवगतीने

Latest Marathi News Live Update : पुणे शहरात उद्यापासून प्रतिबंधात्मक आदेश लागू; परवानगीशिवाय सभा, मिरवणुकांना बंदी

SCROLL FOR NEXT