doctor
doctor 
मुंबई

कोरोना रुग्णांची सेवा करणारे निवासी 'डॉक्टर' विद्यावेतनावरुन नाराज

सकाळवृत्तसेवा

मुंबई, ता. 27 : कॉलेज ऑफ फिजिशियन्स अँड सर्जन्स संस्थेत पदव्युत्तर पदविका पूर्ण करणारे डॉक्टर महापालिका रुग्णालयांत कोव्हिड-19 रुग्णांची सेवा करत आहेत. या निवासी डॉक्टरांना दरमहा फक्त 14,800 रुपये विद्यावेतन देण्यात येते. इतर वैद्यकीय महाविद्यालयांतील निवासी डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, हाऊस ऑफिसर यांना दरमहा किमान 50 हजार रुपये वेतन अथवा विद्यावेतन मिळते. हे सर्व डॉक्टर किमान  एमबीबीएस पदवीधारक असतात. विद्यावेतनातील असा भेदभाव फक्त मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांतच होत असून, त्याबाबत सीपीएस डॉक्टरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

मुंबई महानपालिकेद्वारा संचालित रुग्णालयातील एमडी/ एमएस/ डीएनबी आदी अभ्यास करणारे निवासी डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, हाऊस ऑफिसर यांना विद्यावेतन वा वेतनापोटी दरमहा किमान 54 हजार रुपये मिळतात. मग आमच्याकडूनच फक्त 14 हजार 800 रुपये विद्यावेतनात काम का करून घेतले जाते, असा सवाल सीपीएस डॉक्टर करत आहेत. पदव्युत्तर पदविका करणारे निवासी डॉक्टर इतर निवासी डॉक्टरांप्रमाणेच सक्षमपणे काम करतात आणि विविध विभागांमध्ये 24 तास सेवा देतात. नैसर्गिक आपत्ती असो वा अन्य कोणतेही संकट असो, ते सेवेसाठी तत्पर असतात. अशा स्थितीत हा भेदभाव कशासाठी, अशी विचारणा ते करत आहेत. 

सध्या संपूर्ण जगावर कोव्हिड-19महामारीचे सावट असून, मुंबई तर भारताची कोरोना राजधानीच बनली आहे. अशा परिस्थितीत सीपीएसचे निवासी डॉक्टर महापालिकेच्या रुग्णालयांत कोरोना वॉर्ड, आयसीयू , विलगीकरण वॉर्डमध्ये सक्षमपणे अहोरात्र सेवा देत आहेत. सरकारने नुकतीच निवासी डॉक्टरांचे विद्यावेतन 10 हजार रुपयांनी वाढवून 64 हजार रुपये केले आहे. इंटर्नशिप करणाऱ्या विद्यार्थ्यांना 50 हजार रुपये विद्यावेतन मिळते. परंतु, सीपीएस निवासी डॉक्टरांचे विद्यावेतन केवळ14,800 रुपये असल्याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. 

सध्याच्या महागाईच्या काळात 14,800 रुपयांचे मासिक विद्यावेतन स्वतःचा आणि कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी पुरेसे नाही. समान काम- समान वेतन या संवैधानिक अधिकारानुसार आम्हालाही 50 हजार रुपये विद्यावेतन द्यावे आणि शक्य असल्यास महिन्यांची थकबाकी द्यावी.
- डॉ. अक्षय गवई, अध्यक्ष, असोसिएशन ऑफ रेसिडंट डॉक्टर्स ऑफ सीपीएस

कामाचा काहीच अनुभव नसलेल्या इंटर्नशिप करणाऱ्या विद्यार्थ्यांना 50 हजार रुपये विद्यावेतन, इतर निवासी डॉक्टरांना 64 हजार रुपये वेतन आणि सीपीएस निवासी डॉक्टरांना केवळ 14,800 रुपये विद्यावेतन हा महापालिकेचा दुटप्पीपणा आहे. 
- डॉ. अक्षयकुमार मरगळे, उपाध्यक्ष, असोसिएशन ऑफ रेसिडंट डॉक्टर्स ऑफ सीपीएस

निवासी डॉक्टरांचे  विद्यावेतन

  • जगजीवनराम रेल्वे हॉस्पिटल, मुंबई सेंट्रल : 53,000
  • मुंबई पोर्ट ट्रस्ट हॉस्पिटल : 51,000
  • शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गोंदिया : 51,000
  • शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर : 51,000
  • स्वामी रामानंदतीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अंबाजोगाई : 51,000
  • श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ : 51,000
  • ठाणे महापालिका राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय, कळवा : 48,000
  • नानावटी रुग्णालय, विलेपार्ले (पश्चिम) : 45,000
  • होली फॅमिली हॉस्पिटल, वांद्रे : 40,000

Resident doctors serving Corona patients are upset over the scholarship

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: पुन्हा सूरत पॅटर्न! शेवटच्या दिवशी काँग्रेस उमेदवाराने अर्ज मागे घेत केला भाजप प्रवेश..काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update: ठाणे लोकसभा उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ आदित्य ठाकरे घेणार सभा

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

Health Care : अवकाळी पावसानंतर सावधगिरी बाळगा; सर्दीसह दमा, श्वसन विकारात होते वाढ

SCROLL FOR NEXT