मुंबई

ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट बाबत जनजागृती मोहीमेला उत्फुर्त प्रतिसाद

रविंद्र खरात

कल्याण - ईव्हीएम (इलेक्‍ट्रॉनिक व्होटिंग मशिन) आणि व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफाइड पेपर ऑडिट ट्रेल) मशिनबाबत असलेल्या शंकांचे निरसन करण्यासाठी निवडणूक आयोगा मार्फत कल्याणमध्ये जनजागृती मोहीम राबविण्यास सुरुवात झाली असून त्याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती कल्याण तहसिलदार अमित सानप यांनी दिली.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशिनबाबत काही जणांकडून शंका व्यक्‍त करण्यात येतात. काही राजकीय पक्षांनी ईव्हीएम मशिनऐवजी मतदानपत्रिकेचा वापर करण्याचे आवाहन निवडणूक आयोगाकडे केले आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने याबाबत मतदारांमध्ये जागृती करण्याचे काम सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून कल्याण पूर्व पश्चिम , कल्याण ग्रामीण आणि डोंबिवली विधानसभा मतदार संघात  ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशिनच्या प्रात्यक्षिकाचे आयोजन केले आहे. एका मतदारसंघात दोन मोबाईल व्हॅन 2 आणि 4 मशीन ..., अशा प्रकारे कल्याण डोंबिवली परिसरात 4 विधानसभा मतदार संघात 8 मोबाईल व्हॅन फिरत आहे , मतदान केंद्रे, महाविद्यालये, सरकारी कार्यालये, कल्याण डोंबिवली महापालिका कार्यालय , प्रभाग क्षेत्र कार्यालय झोपडपट्ट्यांमध्ये ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशिनवर मतदानाचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात येत असून मतदारांमध्ये ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशिनबाबत जागृती व्हावी, यासाठी आज मंगळवार ता 2 जानेवारी रोजी मतदान नोंदणी अधिकारी नरेश वंजारी , तहसिलदार अमित सानप आणि नायब तहसिलदार अर्चना प्रधान आदींनी कल्याण मध्ये विविध ठिकाणी नागरिकांना मार्गदर्शन करत मतदाराने मतदान केल्यानंतर ते कुणाला दिले हे कसे बघायचे याबाबत प्रात्यक्षिक करून दाखविले आणि अनेक प्रश्नांची उत्तरे ही दिली . 27 डिसेंबर पासून ही मोहीम सुरू असून आगामी 65 दिवस ही मोहीम सुरू राहणार असल्याची माहिती तहसिलदार अमित सानप यांनी दिली .

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : सत्ता नसतानाही विकास करता येतो

Loksabha Election 2024 : मतदानासाठी परदेशातील पुणेकर शहरात दाखल

Loksabha Election 2024 : बारामतीत वाढलेली लाखभर मते ठरविणार खासदार ; एकूण ५९.५० टक्के मतदान,पुरुषांचा टक्का वाढला, महिलांचा प्रतिसाद कमी

Nashik Police: पोलीस महासंचालकांनी घेतला सुरक्षा यंत्रणेचा आढावा! लोकसभा निवडणुक, पंतप्रधान सभेच्या पार्श्वभूमीवर सूचना

Yerwada Jail News : येरवडा कारागृहात कैद्यांकडून हवालदाराला बेदम मारहाण

SCROLL FOR NEXT