n95 mask 
मुंबई

एन 95 मास्कच्या किमतीचा फेरविचार करा; मुंबई हायकोर्टाचे केंद्र सरकारला आदेश 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोना संसर्गाच्या आजारांमध्ये महत्वपूर्ण ठरलेले एन 95  मास्कच्या खरेदी-विक्रीबाबत कमी किंमती निश्चित करण्याबाबत फेरविचार करावा, असे आदेश आज मुंबई उच्च न्यायालयाने केन्द्र सरकारला दिले. 

एन95 मास्कच्या खरेदी विक्रीमध्ये गैरप्रकार होत असल्याचा आरोप करणारी जनहित याचिका सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. याचिकेवर आज मुख्य न्यायाधीश दिपांकर दत्ता आणि न्यायाधीश एस एस शिंदे यांच्या खंडपीठापुढे व्हिडीओ कौन्फरन्सिंगमध्ये सुनावणी झाली.

 मास्क च्या किमती नियमित आणि परवडणारे असावे, असे राज्य सरकारच्या वतीने याआधीच केन्द्र सरकारला सुचविले आहे, असे सरकारकडून सांगण्यात आले. पण केन्द्र सरकारने यापूर्वीच 45 टक्के सवलतीच्या दराने मास्क किमती कमी केल्या आहेत, असे अतिरिक्त सौलिसिटर जनरल अनील सिंह यांनी खंडपीठापुढे सांगितले.

 मास्क जीवनावश्यक वस्तू आहे, त्यामुळे त्याची किंमतही त्याचप्रमाणे सर्व नागरिकांना परवडेल अशी असायला हवी, त्यामुळे त्याच्या किमतीचा पुनरविचार करा, अन्यथा न्यायालय योग्य ते आदेश देईल, असे खंडपीठाने स्पष्ट केले. यानंतर, याबाबत फेरविचार करण्यात येईल, असे सिंह यांनी न्यायालयाला सांगितले. 

कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी सेवेत असलेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांकरिता एन95 मास्कचे वाटप करण्यासाठी दमानिया यांच्या संस्थेने उपक्रम राबविला आहे. मात्र यासाठी त्यांना वेगवेगळ्या उत्पादक विक्रेत्यांकडून किमतीमध्ये तफावत असल्याचे आढळून आले आहे. तसेच यामध्ये काळाबाजार आणि नफेखोरी होत असल्याची शक्यता आहे, असे त्यांनी याचिकेत व्यक्त केली आहे.

rethink about price of N95 mask mumbai HC order central government 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs IND: दुसऱ्या T20I सामन्यातील भारताच्या पराभवानंतर गौतम गंभीरचं सूर्यकुमारसोबत वाजलं? Viral Video मुळे चर्चेला उधाण

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी घेतली मृत डॉक्टर युवतीच्या कुटुंबियांची भेट; ''राजकारण करण्यापेक्षा सर्वांनी एकजुटीने लढा...''

Georai News : बीडच्या गेवराईत रहात्या घरातच युवकाने गळफास घेऊन जीवन संपविले; कारण अस्पष्ट

Parner News : वाळू वाहतुकदारास दंड करणा-या अधिकाऱ्यांकडूनच १५ लाख ५१ हजार रुपये दंड वसूल केला जाणार

Akola News : बीपी तपासायला सांगताच घातला गोंधळ, उपचार सुरु असतानाच रुग्णाच्या कुटुंबियांचा डॉक्टरांवर हल्ला, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT