smoking kills sakal media
मुंबई

'रिव्हर्स स्मोकिंग'चा जीवाला धोका, महिलांमध्येही कर्करोग बळावतोय

मिलिंद तांबे

मुंबई : पुरुषांमध्ये फुफ्फुसाचा कर्करोग (cancer) होण्याचे प्रमाण प्रचंड आहेच. मात्र,आता महिलांमध्ये (woman smoking) या आजाराचे वाढते प्रमाण ही सध्या चिंतेची बाब ठरत आहे. 'रिव्हर्स स्मोकिंग'मुळे महिलांचा जीव (woman life in danger) धोक्यात आला असून त्यामुळेच फुफ्फुसाच्या कर्करोगाचे (lung cancer) प्रमाण वाढले असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे (doctors) म्हणणे आहे. (reverse smoking in female increasing suffering lung cancer -nss91)

वजन घटणे, सतत थुंकी जमा होणे, कफ, खोकल्यातून रक्त पडणे ही फुफ्फुसाच्या कर्करोगाची काही मुख्य लक्षणे आहेत असे ही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. फुफ्फुसांमधून कर्करोग एकदा पसरला की तो यकृतापर्यंत पोहोचून कावीळ होते आणि मूत्रपिंडाजवळील ग्रंथीमध्ये पसरून त्यांना निष्क्रिय करतो. त्यामुळे रक्तदाब अत्यंत कमी होऊन आपत्कालीन स्थिती निर्माण होते. वेदना आणि हाडांना फ्रॅक्चर होणे आणि कर्करोग मेंदूपर्यंत पोहोचला की स्ट्रोक किंवा फिट येण्याची शक्यता शकते.

धूम्रपान, तंबाखू खाणे, खैनी, हुक्का, तंबाखू असलेले पान, रिव्हर्स स्मोकिंग, घरातील किंवा ट्रॅफिकमधील प्रदुषित घटक हे फुफ्फुसाचा कर्करोग होण्यामागील मुख्य कारणे आहेत. शिवाय, कारखान्यात, खाणीत काम केल्यानेही हा आजार होऊ शकतो. तसेच येत्या काही वर्षांत तंबाखूशी संबंधित कारणांमुळे हा आजार होण्याचे प्रमाण 12 टक्क्यांपर्यंत वाढण्याची भीती देखील व्यक्त करण्यात आली आहे.

बऱ्याचदा फुफ्फुसाच्या कर्करोगाला सुरुवातीच्या टप्प्यात टयुबरक्युलोसिस समजले जाते. कारण, या दोन्ही आजारांची लक्षणे बऱ्यापैकी सारखीच आहेत असे मेडिकल आँकॉलॉजिस्ट डॉ.एस. विश्वनाथ म्हणाले.दोन्हीमध्ये रुग्णाला खोकला किंवा खोकल्यासह रक्त पडण्याचा त्रास होतो. फुफ्फुसाचा कर्करोग होण्यामागे धूम्रपान हे मुख्य कारण आहे. धूम्रपान करणारे आणि न करणारे यांच्यात फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचा धोका 20:1 या प्रमाणात असतो असे ही ते पुढे म्हणाले.

फुफ्फुसाच्या कर्करोगाचे 50 टक्के रुग्ण निदानानंतर पहिल्या वर्षभरातच दगावतात. मात्र, कर्करोगाचे निदान सुरुवातीच्या टप्प्यात झाले तर आपण मृत्यूमध्ये 14 ते 20 टक्के घट करू शकतो असे सर्जिकल आँकॉलॉजी डॉ. जगन्नाथ दिक्षित म्हणाले. मात्र, सुरुवातीच्या टप्प्यातली लक्षणे फारशी दिसून येत नाहीत. त्यामुळे फुफ्फुसाचा कर्करोग सुरुवातीच्या टप्प्यात समजणेही कठीण असते असे ही त्यांनी सांगितले.

ग्रामीण महिलांमध्ये रिव्हर्स स्मोकिंग हे फुफ्फुसांचा कर्करोग होण्यामागील एक प्रमुख कारण ठरत आहे. कर्करोगग्रस्तांना बहुविध दृष्टिकोनातून उपचार मिळावेत यावर डॉ. दिक्षित यांनी भर दिला. सर्जिकल, मेडिकल, मोलेक्युलर पॅथॉलॉजिस्ट आणि जेनेटिक कौन्सुलर यांचा यात सहभाग असावा. टारगेटेड थेरपी आणि जेनेटिक टेस्टिंगमुळे रुग्णाचे वाचण्याचे प्रमाण लक्षणीय रित्या वाढले आहे असे ही डॉ.दीक्षित म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kishor Kadam : अभिनेता किशोर कदम यांनी उजेडात आणला आणखी एक भयंकर प्रकार, व्यक्त केली 'ही' भीती; मुख्यमंत्री फडणवीसांकडे महत्त्वाची मागणी

Pune Crime: 'आयुष कोमकर खूनप्रकरणी आंदेकर टोळीतील चौघांना अटक'; गुजरातमधील द्वारका येथून घेतले ताब्यात, सोमवारी न्यायालयात हजर करणार

IND A vs AUS A: विराट, रोहित यांची फक्त हवा... ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या ODI मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, रजत पाटीदार कॅप्टन

Latest Marathi News Updates: भारत-पाकिस्तान सामन्याविरुद्ध आम आदमी पक्षाच्या (आप) कार्यकर्त्यांनी निदर्शने

Pune Fraud: 'चांगल्या परताव्याच्या आमिषाने दोघांची ४८ लाखांची फसवणूक'; सायबर चोरट्यांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल

SCROLL FOR NEXT