racket rickshaw driver arrested
racket rickshaw driver arrested 
मुंबई

सव्वातीन लाखाच्या गांजासह रिक्षाचालकाला अटक

सकाळवृत्तसेवा

उल्हासनगर - दोन मोठ्या ट्रॅव्हलिंग बॅगमध्ये तब्बल सव्वातीन लाख रुपये किमतीचा गांजाचा साठा विक्रीसाठी बाळगणाऱ्या उल्हासनगरमधील रिक्षाचालकाला उल्हासनगर गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून २१ किलोंवर गांजा जप्त करण्यात आला आहे. गुन्हे अन्वेषणचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश तरडे यांनी ही माहिती दिली.

कॅम्प नंबर ४ सुभाष टेकडी परिसरातील गणेश शेट्टी या रिक्षाचालकाकडे प्रचंड प्रमाणात गांजाचा साठा असल्याची माहिती मिळताच, वरिष्ठ  अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक युवराज सालगुडे, असरुद्दीन शेख, श्रीकृष्ण नावले, उपनिरीक्षक गणेश तोरगल, उदय पालांडे, आर. टी. चव्हाण, एस. के. पवार, रमजू सौदागर, महाशब्दे, माळी, जी. के. जंगम, जगदीश कुलकर्णी, जावेद मुलानी, एन. एन. वाघमारे, डी. बी. भोसले यांनी शेट्टी याच्या घरावर छापा मारला. घराची झडती घेतली असता दोन मोठ्या ट्रॅव्हलिंग बॅगमध्ये २१ किलोंवर असणारा सुमारे सव्वातीन लाख रुपयांचा साठा आढळून आला. टेकडी परिसरात गांजा विकण्यासाठी ठेवण्यात आला होता, अशी कबुली शेट्टी याने दिली आहे. न्यायालयाने त्याला १४ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. हा साठा कुठून आणि कुणाकडून आणला? उल्हासनगरात किती ठिकाणी गांजा विकला जातो? प्रमुख तस्कर कोण? याची कसून चौकशी करण्यात येणार असल्याचे महेश तरडे यांनी सांगितले.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी मध्यवर्ती पोलिसांनी भाऊ-बहिणीसह पाच जणांना गांजा प्रकरणात अटक केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Video : नरेंद्र मोदींनी काढली बाळासाहेब ठाकरेंची आठवण; म्हणाले, डीएमकेचे लोक सनातन धर्माला डेंग्यू म्हणत आहेत...

IPL 2024 DC vs MI Live Score : तिलक वर्माचे अर्धशतक! टीम डेविडचीही फटकेबाजी; मुंबई मिळवणार विक्रमी विजय?

PM Modi Kolhapur Rally: पंतप्रधान मोदींच्या सभेला संभाजी भिडेंची हजेरी; मोदींचं कोल्हापुरकरांना पुन्हा सत्तेत आणण्याचं केलं आवाहन

Tristan Stubbs DC vs MI : 4,4,6,4,4,4 एकाच षटकात होत्याचं नव्हतं झालं! स्टब्सच्या तडाख्यात वूडची शकलं

Latest Marathi News Live Update : पाच वर्षात पाच पंतप्रधान करण्याचा इंडिया आघाडीचा प्लॅन- मोदी

SCROLL FOR NEXT