मुंबई

रिक्षाचा मुक्त परवाना बंद होणार; रिक्षा पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली मागणी

प्रशांत कांबळे

मुंबई - राज्यातील मुक्त परवाना धोरण लवकरच रद्द करण्याचे संकेत परिवहन मंत्री अॅड.अनिल परब यांनी दिले आहे. नुकतेच रिक्षा पंचायत समितीच्या  पदाधिकाऱ्यांनी रिक्षा चालकांच्या प्रलंबित मागण्याचे निवेदन परिवहन मंत्र्यांना दिले होते. दरम्यान मुक्त परवाना धोरण रद्द करणे आणि त्यांच्यासाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यासंदर्भात परब यांनी सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे आश्वासन दिल्याचे सामाजीक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी सकाळ शी बोलतांना सांगितले.

राज्यात सध्या खुले परवाना धोरण असल्याने रस्त्यांवरील रिक्षांची संख्या वाढली आहे. तर मुळ रिक्षा चालकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो आहे. राज्यात 10 लाखांपेक्षा जास्त रिक्षा चालक असून, ठाणे, कल्याण या भागात रिक्षांची संख्या जास्त आहे. मात्र, कोरोनाच्या माहामारीमूळे रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामूळे मुक्त परवाना धोरण लवकर बंद करावे, रिक्षा चालक कल्याणकारी मंडळाची स्थापना करावी, तर पुण्यातील वाहनांच्या फिटणेस तपासणीसाठी त्रास सहन करावा लागत असल्य़ाने, आळंदी येथील रोलर ब्रेक टेस्टर लवकरच सुरू करावे अशा मागण्या रिक्षा पंचायत समितीने परिवहन मंत्र्य़ाकडे केल्या आहे. 

त्यासोबतच लॉकडाऊन काळात रिक्षा चालकांचा व्यवसाय ठप्प होता. त्यामूळे विमा परतावा मिळवून देण्यासाठी परिवहन विभागाकडून वाहन बंद असल्याचे प्रमाणपत्र  मिळवून देणार असल्याचे सुद्धा परब यांनी सांगितले असल्याचे आढाव यांनी सांगितले.   

राज्यातील रिक्षा चालकांच्या व्यथा आणि प्रलंबित मागण्यांचे निवेदन परिवहन मंत्र्यांना दिले आहे. त्यावर त्यांनी सकारात्मक भुमीका घेत, प्रामुख्याने परवाना मुक्त धोरण आणि कल्याणकारी मंडळाच्या संदर्भात लवकरच निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे. 
- बाबा आढाव,
सामाजिक कार्यकर्ता

समितीच्या मुख्य मागण्या 

  • - जिल्हानिहाय रिक्षा-टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ स्थापन करावे.
  • - लॉकडाउन काळातील वाहन कर्जाचे हप्ते शासनाने भरावे
  • - चार महीने रिक्षा बंद असल्याचे प्रमाणपत्र प्रादेशिक परिवहन विभागाने द्यावे
  • - रिक्षाचा मुक्त परवान रद्द करा

Rickshaw free license will be discontinued Rickshaw Panchayat Samiti office bearers demanded

----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे ) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-New Zealand FTA: 20 ऑक्टोबरपासून दारू होणार स्वस्त! भारत-न्यूझीलंड FTA मुळे तुम्हाला काय फायदा?

Tempo Bike Accident : भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पोने दोन मोटारसायकलला पाठीमागुन उडविल्याने एक जणाचा मृत्यू; तर एकजण जखमी

Marathi News Live Updates: पाण्याची टाकी पाडताना जखमी झालेल्या कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू

Pitru Paksha 2026: यंदा पितृ पंधरवडा कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या महत्त्वाच्या तिथी

Marathwada Drought : पावसाने पाठ फिरवली; शेतकरी हवालदिल;सोयाबीनला पाणी देण्याची धडपडही निष्फळ; आर्थिक संकट गडद

SCROLL FOR NEXT