CNG gas
CNG gas Sakal
मुंबई

सीएनजी जुन्या दरातच रिक्षा-टॅक्सीचालकांना मिळावे

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ऑटोरिक्षा चालक-मालक सीएनजी कमी दराने मिळावा, या मागणीसाठी मंगळवारी (ता. १७) महानगर गॅसच्या बीकेसीतील कार्यालयावर ऑटोरिक्षांसह मोर्चा काढणार आहेत. मुंबई ऑटोरिक्षा टॅक्सीमेन्स युनिनने वेळोवेळी मागणी करूनही निर्णय होत नसल्याने अखेर मोर्चा काढण्याचा इशारा देण्याची वेळ आल्याचे शशांक राव यांनी सांगितले.

प्रदूषण मुक्त मुंबई या उद्देशासाठी ऑटोरिक्षा चालक-मालकांना त्यांची वाहने सीएनजी इंधनावर चालविण्यास, नवीन खरेदी करण्यास सक्ती करण्यात आली होती. त्यामुळे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील सर्व ऑटोरिक्षा आजमितीस सीएनजी इंधनावर चालत आहेत. तसेच खासगी वाहनांनी सुद्धा सीएनजी इंधनावर चालावी यासाठी सरकारकडून प्रोत्साहन देण्यात येत आहे, त्यामुळे सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांची संख्या वाढत आहे.

ऑटोरिक्षा हे सार्वजनिक प्रवासी वाहतूकीचे साधन आहे, तसेच या वाहनातून लाखो प्रवासी रोज एमएमआर क्षेत्रांमध्ये प्रवास करतात. मिळालेल्या माहितीनुसार, सद्यस्थितीत भारतात मिळणाऱ्या सीएनजी व्यतिरिक्त मोठ्या प्रमाणात सीएनजी परदेशातून आयात होतो. परिणामतः सीएनजीचे दर वाढलेले आहेत. त्यामुळेच भारतात उपलब्ध होणाऱ्या सीएनजीचा जो दर भारत सरकार ठरवते, त्या दराने सीएनजी ऑटोरिक्षा चालक मालकांना उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी शशांक राव यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Labour Day : 1 मे ला कामगार दिवस का म्हटले जाते? काय आहे यामागचा इतिहास? वाचा सविस्तर

रोहित शर्मा-विराट कोहली आंतरराष्ट्रीय टी-२० ला ठोकणार रामराम, 2024 चे वर्ल्डकप शेवटचे- रिपोर्ट

शेतकऱ्यांच्या फायद्याची बातमी! पीक कर्जाच्या पुनर्गठनासाठी ऑगस्टपर्यंत मुदत; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सवलत, पण शेतकऱ्यांची संमती पुनर्गठन आवश्यक

Maharashtra Day 2024: महाराष्ट्र दिनानिमित्त द्या खास अंदाजात मराठमोळ्या शुभेच्छा

Latest Marathi News Live Update : राम सातपुतेंच्या प्रचारसभेसाठी योगी आदित्यनाथ यांची आज सोलापुरात सभा

SCROLL FOR NEXT