मुंबई

महाड-भोर मार्गावर वरंधा घाटातील रस्ता पुन्हा खचला; अवजड वाहतूक ठप्प

सुनिल पाटकर

महाड : गत आठवड्याभरापासून घाटमाथ्यासह कोकणात पावसाचा जोर वाढल्याने महाड-भोर-पुणे रस्त्यावरील वरंध घाटात माझेरी गावाजवळ रस्ता खचल्याची बातमी समोर येत आहे. हा रस्ता खचल्याने या मार्गावरील अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यंदाच्या पावसाळ्यात हा घाट दुसऱ्यांदा खचला आहे. यापूर्वी वाघजाई मंदिराजवळ रस्ता खचला होता.

महाडहून पुणे, भोर तसेच पंढरपूरला जाण्यासाठी हा मुख्य रस्ता आहे. त्यामुळे एसटी व मालवाहतूक मोठ्या प्रमाणात या घाटातून सुरु असते. महाड, दापोली, खेड, मंडणगड या भागातून अनेक वाहने येथून ये-जा करत असतात. मागील वर्षी महाड हद्दीत घाटरस्ता वाहून गेल्याने पावसाळ्यात महिनाभर हा घाट बंद होता. रस्ता खचणे, दरड कोसळणे यामुळे हा घाट धोकादायक बनला आहे. 

गत दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे मोझरी गावच्या वरील बाजूस रस्ता खचून काही भाग वाहून गेला आहे. मागील वर्षी जेथे रस्ता खचला होता, त्यापुढे हा भाग आहे. माझेरीचे  माजी सरपंच अनिल मालुसरे यांनी  तात्काळ येथे भेट देऊन संबंधित विभागाला माहिती दिली. खबरदारीचा उपाय म्हणून अवजड वाहतूक बंद झाल्याने काही वाहने घाटात अडकली आहे. सध्या केवळ लहान वाहनेच येथून जात आहेत. या घाटाला जवळून पर्यायी मार्ग नसल्याने वाहनचालकांची गैरसोय होणार आहे. या घटनेबाबत बांधकाम विभागाशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
----
संपादन : ऋषिराज तायडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Mumbai Loksabha: वर्षा गायकवाडांना निवडणूक जाणार कठीण? या कारणामुळे नसीम खान नाराज

Goldy Brar: गोल्डी ब्रार जिवंत! कॅलिफोर्नियात मारलेली व्यक्ती दुसरीच; अमेरिकन पोलिसांचा खुलासा

Latest Marathi News Live Update : 10 नक्षलवाद्यांच्या मृतदेहांसह शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त

SCROLL FOR NEXT