महिलेचे दागिने लुटून चोरट्याचे पलायन
महिलेचे दागिने लुटून चोरट्याचे पलायन 
मुंबई

महिलेचे दागिने लुटून चोरट्याचे पलायन

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : गरिबांना अन्नधान्याचे वाटप करण्यात येत असल्याचे भासवून एका भामट्याने कामोठे भागात राहणाऱ्या महिलेचे दागिने व रोख रक्कम लुटून पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. कामोठे पोलिसांनी याप्रकरणी भामट्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.

फसवणूक झालेल्या रेहना मुख्तार शेख (५०) या कामोठे सेक्‍टर- १६ मध्ये राहावयास आहेत. शेख यांना त्यांची सून नाजनिन हिने फोनवरून कामोठे सेक्‍टर- १२ मध्ये एक व्यक्ती गरिबांना धान्य व तेलाचे डबे वाटप करत असल्याचे सांगितले. त्यामुळे रेहाना शेख यांनी या भामट्याकडे विचारपूस असता त्याचे वडील गरिबांना अन्नधान्याचे दान करत असल्याचे सांगितले; मात्र अंगावर सोन्याचे दागिने पाहिल्यास ते दान करणार नाहीत, त्यामुळे भामट्याने रेहाना शेख यांना अंगावरील दागिने काढून पर्समध्ये ठेवण्यास सांगून सोबत येण्यास सांगितले. त्यानुसार रेहाना शेख यांनी आपली पर्स बाजूला असलेल्या इस्त्रीच्या दुकानात ठेवली. 

शेख यांना त्याने पहिल्या मजल्यावर जाण्यास सांगितले. त्यानुसार रेहाना शेख पहिल्या मजल्यावर गेल्या असता भामट्याने इस्त्रीच्या दुकानात ठेवलेली रेहाना शेख यांची दागिने व रोख रक्कम असलेली पर्स घेऊन पलायन केले. पहिल्या मजल्यावर कुणीही नसल्याने रेहाना शेख यांनी खाली येऊन इस्त्रीच्या दुकानदाराकडे आपल्या पर्सची मागणी केल्यानंतर त्यांच्यासोबत आलेल्या तरुणाने त्यांची पर्स नेल्याचे त्याने सांगितले. आपली फसवणूक झाल्याचे रेहाना यांच्या लक्षात आल्याने त्यांनी कामोठे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे पहिल्यांदाच काँग्रेसला देणार मत; मतदानापूर्वी केली मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update: लोकसभेच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी लातूरमधील उदगीर येथे दाखल

Majhyashi Nit Bolaycha Rap Song: अनीचा आळस आणि आईचा ओरडा; 'या' तरुणानं लिहिलेलं भन्नाट रॅप साँग सोशल मीडियावर घालतंय धुमाकूळ

Summer Trip: उन्हाळ्यात चेरापुंजीला फिरायला जाण्याता प्लॅन करत असाल तर 'या' ठिकाणांना नक्की भेट द्या

IPL 2024 DC vs MI Live Score : वूडने मुंबईला मिळवून दिलं तिसरं यश, पण दिल्लीचीही 200 धावांकडे वाटचाल

SCROLL FOR NEXT