मुंबई

तिकीट दलालांविरोधात आरपीएफची विशेष मोहीम 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मध्य रेल्वेने तिकीट काळाबाजार करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई सुरू केली आहे. रेल्वे प्रशासनाने राबविलेल्या या मोहिमेत आतापर्यंत पाच विभागामध्ये 26 ऑक्‍टोबर ते 3 नोव्हेंबरपर्यंत 20 लाख 55 हजार 853 रुपयांची तिकिटे जप्त केली आहेत. ही कारवाई मध्य रेल्वेच्या मुंबई, पुणे, सोलापूर, भुसावळ आणि नागपूर विभागात करण्यात आली असून या विभागातून 46 दलालांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे तिकीट दलालांमध्ये खळबळ उडाली आहे. 

तिकीट दलाल हे लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मोठ्या प्रमाणात आरक्षण करतात. त्यामुळे सामान्य प्रवाशाला तिकीट उपलब्ध होत नाही. उन्हाळ्यात आणि दिवाळीत सुट्ट्या असल्यामुळे तिकीट मिळणे कठीण होते. अशा प्रवाशांना तिकिटांची विक्री करण्यासाठी दलाल तिकीट घराजवळच येऊन प्रवाशांशी संपर्क साधतात. इतर पर्याय उपलब्ध नसल्यामुळे प्रवासीही या दलालांकडून तिकीट घेतात.

या सर्वांना आळा बसावा यासाठी मध्य रेल्वेच्या सुरक्षा दलाने कंबर कसली आहे. मध्य रेल्वेच्या 5 विभागात हे कारवाई अभियान चालविण्यात आले. 26 ऑक्‍टोबर ते 3 नोव्हेंबरदरम्यान चाललेल्या या कारवाईत 46 तिकीट दलालांकडून 490 लाईव तिकीट पकडण्यात आली असून त्यांची एकूण किंमत 20 लाख 55 हजार 853 रुपये असल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली आहे. तसेच प्रवाशांना आवाहनसुद्धा करण्यात आले आहे की, जर तुम्हाला अशा दलालांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यास मध्य रेल्वेच्या हेल्पलाईन क्रमांकावर त्वरित तक्रार करावी.  

 web title : RPF's Special Campaign Against Ticket Brokers

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

CSK vs PBKS : 'सेल्फिश' धोनी! शेवटच्या ओव्हरमधील ड्राम्यानंतर थाला होतोय ट्रोल, Video Viral

Share Market Today: शेअर बाजार उघडताच 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

SCROLL FOR NEXT