सफाळे ः माकुणसार येथे रविवारी झालेल्या राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी झालेले स्पर्धक. 
मुंबई

माकुणसारमधील मॅरेथॉनमध्ये राज्यभरातील खेळाडूंची धाव

सकाळ वृत्तसेवा

सफाळे ः माकुणसार स्पोर्टस्‌ फाऊंडेशन, पालघर जिल्हा ॲथलेटिक्‍स असोसिएशन आणि महाराष्ट्र ॲथलेटिक्‍स असोसिएशन यांच्या मान्यतेने झालेल्या चौथ्या माकुणसार मॅरेथॉन स्पर्धेत रविवारी खेळाडूंनी उत्साही सहभाग घेतला.

स्पर्धेत जिल्ह्यासह तसेच राज्याच्या कानाकोपऱ्याोतून बहुसंख्य धावपटू सहभागी झाले होते. स्पर्धेत सफाळे, पालघर, विक्रमगड, वाडा, जव्हार, वसई, मुंबई तसेच परभणी येथील ग्रामीण तसेच शहरी भागातील खेळाडूंचा विशेष बदबा दिसून आला. हरित पर्यावरण संरक्षण आणि सुदृढ आरोग्य यांचा संदेश देण्यासाठी स्पर्धा झाली. 

मॅरेथॉनचे उद्‌घाटन आणि फ्लॅग ऑफ ऑलम्पिक धावपटू आनंद मिनेजीस, उद्योजक गिरीश राऊत, उद्योजिका रोषना सुलाखे, केळवे सागरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजू नरवडे, माकुणसार पतसंस्था उपाध्यक्ष कमळाकर पाटील आणि पंचायत समिती गटनेते सुभाष म्हात्रे यांच्या हस्ते झाले. एकूण चार गटात स्पर्धा झाली. 

मॅरेथॉनचे पारितोषिक वितरण स्व. स्वप्नील हरेश्‍वर किणी व्यासपीठावर झाले. या वेळी पालघर रोटरी क्‍लबचे अध्यक्ष अमित पाटील, सफाळे लायन्स क्‍लबचे अध्यक्ष हरेश ठाकूर, सहायक पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील, राज्य आदर्श शिक्षक प्रमोद पाटील, माजी सैनिक शैलेश ठाकूर, माकुणसार पतसंस्था अध्यक्ष प्रकाश ठाकूर, माकुणसार ग्रामपंचायत सरपंच जयंत पाटील आणि उपसरपंच अमोल मोहिते तसेच प्रमोद किणी, दत्तात्रय किणी आदी उपस्थित होते.

मॅरेथॉन स्पर्धेसाठी लक्ष्मीकांत पाटील, माकुणसार स्पोर्टस्‌ फाऊंडेशनचे अध्यक्ष मनीष ठाकूर, उपाध्यक्ष मनीष किणी, चिटणीस रुपेश पाटील, खजिनदार योगेश म्हात्रे तसेच 
स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. पंकज म्हात्रे, राजेश वैद्य आणि प्रतिक मोरे यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: १९९४ चा जीआर नेमका काय आहे? मराठा समाज आरक्षणाबाहेर राहिला, कारण...

Pachod News : चौकशीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या धमकीने घाबरलेल्या शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन संपविले जीवन

Latest Marathi News Updates : गावातील रस्त्याना आले नदीचे स्वरूप

कोकणातलं तुम्हाला काय आवडलं? दिलीप प्रभावळकर म्हणाले, 'ते पाहून मीच चकीत झालो कारण...

BCCI ची अब्जावधींची कमाई होते तरी कशी? भारताच्या तुलनेत पाकिस्तान क्रिकेट बोर्ड किती कमावतो पैसा, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT